Home | Magazine | Niramay | news about Summer and urine stone

उन्हाळा अाणि यूरीन स्टाेन: मुतखड्याची लक्षणे, चिकित्सा अाणि उपचार

वैद्य नीलिमा राजगुरू | Update - Apr 03, 2017, 07:10 AM IST

उन्हाळा सुरू झाला की, त्वचेचे, पाेटदुखीचे अाणि मूत्राचे त्रास सुरू हाेतात. बरेचदा लघवी हाेताना त्रास हाेताे, पण नक्की काय हाेते अाहे हे अनेकांच्या लक्षातच येत नाही.

 • news about Summer and urine stone
  उन्हाळा सुरू झाला की, त्वचेचे, पाेटदुखीचे अाणि मूत्राचे त्रास सुरू हाेतात. बरेचदा लघवी हाेताना त्रास हाेताे, पण नक्की काय हाेते अाहे हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. ताे मुतखडाही असू शकताे. त्यावरच तज्ज्ञांकडून प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...
  मुतखड्याची लक्षणे
  - ताप येणे. मूत्रप्रवृत्ती करतेवेळी त्रास. ओटीपोटात दुखणे, पाठीत दुखणे.
  - पुरुषांत शिस्नाच्या टोकाला व स्त्रियांच्या बाह्यमूत्रप्रदेशी दुखणे.
  - मूत्रप्रवृत्ती वेळी दाह होणे.
  - मळमळणे, पोट फुगणे , जड वाटणे
  - पळणे, पोहणे, उड्या मारणे, खूप चालण्याने पोटदुखीची वेदना जांघेतून खाली मूत्रमार्गाकडे जाणे.
  - लालसर लघवी होणे, दुर्गंधी येणे
  - थांबून थांबून जोर देऊन लघवी होणे आणि मूत्राचे प्रमाण कमी होणे.
  मूत्राश्मरी या तिन्ही ठिकाणी होऊ शकतात .
  १) मूत्रपिंडातील खडे :
  हे बाह्य बाजूला किंवा आत नळीच्या तोंडाशी आढळतात. यामध्ये रुग्णाला पाठीमध्ये मणक्यांच्या बाजूला वेदना होतात.
  २) मूत्रनलिकेत खडा असल्यास पोटात कळ येऊन भयंकर वेदना होतात. कळ जांघेतून खाली मूत्रमार्गाकडे जाते.
  ३)मूत्राशयात खडा असल्यास ओटीपोटात भयंकर दुखते व कळ खाली बाह्य मूत्रमार्गापर्यंत जाते.
  मूतखडा सामान्यतः कॅल्शियम ॲाक्झलेट , कॅल्शियम फाॅस्फेट, यूरीक अॅसिड यांचा असतो.आयुर्वेदात याचे वर्णन कदंबपुष्पाप्रमाणे गोल, काटेरी, गुळगुळीत असे केले आहे.
  आयुर्वेदानुसार मुतखड्याचे प्रकार :-
  १) वातज(वातामुळे होणारे)
  २) पित्तज (पित्तामुळे होणारे)
  ३)कफज(कफामुळे होणारे)
  चिकित्सा अाणि उपचार
  चिकित्सा :
  -
  मुतखड्यावर आयुर्वेदात औषधी तसेच शल्यचिकित्साही सांगितली आहे .
  औषधी चिकित्सा :
  -पाषाणभेद, आघाडा, पुनर्नवा, गोखरू, साग, मंजिष्ठ, पळसफुले, वरुण, कुळीथ (हुलगे), शतावरी , अश्मंतक, शेवगा अशा अनेक वनस्पती मुतखड्यावर उपयोगी आहेत. त्या चूर्ण, काढा, सिद्धघृत यापैकी योग्य रूपात वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.
  - चंद्रप्रभावटी, शु. शिलाजीत, गोक्षुरादी गुग्गुळ, वरुणादि काढा इ. औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावीत .
  - क्षारचिकित्सा :- क्षार हा आयुर्वेदातील एक विशेष औषधीप्रकार आहे. वनस्पतींची विशिष्ट तऱ्हेने जाळून राख करून ती पाण्यात विरघळवून त्यापासून क्षार मिळवला जातो. हा क्षार बाह्योपचारासाठी तसेच पोटातूनपण दिला जातो. क्षरण करणे म्हणजेच खरवडून काढणे हा त्याचा गुण आहे. या गुणांनीच तो मुतखड्यावर उपयोगी पडतो. तीळ, आघाडा, केळी, पळस, जवाचे टरफल इ. चा क्षार पोटातून घ्यावा. परत परत मुतखडा होऊ नये म्हणूनही क्षार चिकित्सा घ्यावी. क्षार फार जपून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावेत.
  उपचार :
  -मुतखड्याचे निदान निश्चित असल्यास व रुग्णास खूप पोटदुखी असेल तर अोटीपोटाला वात कमी करणाऱ्या तेलाने अभ्यंग करून वाफेचा शेक देऊन, वात कमी करणाऱ्या गरम तेलाची बस्ती दिल्यास पोटदुखी कमी होते. असे ८/१०/१५ बस्ती केल्यास खडा पडायला मदत होते व नंतरही परत खडे होण्याचे प्रमाण कमी होते.
  -उत्तरबस्ती : काही रुग्णांमध्ये मूत्रमार्गातून नलिका घालून मूत्राशयात औषध सोडले जाते त्यालाच उत्तरबस्ती म्हणतात. {मुतखडा परत परत होऊ नये म्हणून पाळायची पथ्ये
  एम.डी. आयुर्वेद
  drneelimarajguru@gmail.com

Trending