आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातिल सर्वाधिक 100 प्रभावी व्यक्ती, जाणून कोण काय करतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइम मॅग्झिनच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये या वेळेस अनेक भारतीयांनी स्थान मिळवले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांची लीडर्सच्या श्रेणीमध्ये निवड झाली आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झाला कोट्यवधी भारतीयांनी प्रेरणास्रोत आणि आदर्श मानले आहे. सिनेअभिनेत्री प्रियंका चोपडाने कलावंतांच्या वर्गवारीमध्ये सर्वाेच्च स्थान पटकावले आहे. ई-काॅमर्सच्या धुरंधर बिन्नी बंसल, सचिन बंसल यांच्या व्यावसायिक कौशल्याला बहुमान मिळाला आहे. पर्यावरण कार्यकर्त्या सुनीता नारायण, गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि इबोला या भयंकर आजारावर नियंत्रण मिळवल्याबद्दल भारतीय वंशाचे राज पंजाबी यांचे नावही १०० प्रभावी व्यक्तींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रतिष्ठित व प्रभावशाली व्यक्तींमध्ये कार्यकर्ते, कलावंत, खेळाडू आणि वैज्ञानिकांना स्थान मिळाले असले, तरी राजकीय नेत्यांचा यादीत बोलबाला आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, चीनचे शी जिन पिंग, रशियाचे ब्लादीमीर पुतीन यांचा समावेश आहे.
पुढील 19 स्‍लाइड्सवर वाचा, काही प्रभावशाली व्यक्तींबद्दल...