आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव-शहरे स्वच्छतेची जबाबदारी अय्यरांवर, वाचा सध्या चर्चेत असलेले व्यक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावना - परमेश्वरन अय्यर, सेक्रेटरी   
वय - ५७,  
का आहेत चर्चेत -
यांच्याकडे आता अर्धाच कालावधी आहे. स्वच्छता मिशन पूर्ण करण्यासाठी. 
 
गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची गोष्ट आहे. डेहराडून जिल्ह्यापासून १४ किलोमीटर दूर सातेली गावात एक लुकडा व्यक्ती पोहोचली. तिच्या चालण्यात स्फूर्ती आणि उत्साह होता. तिच्याबरोबर आणखी काही लोक होते. ही व्यक्ती ३३ वर्षांनंतर या गावात येत होती. हे कोणी दुसरे तिसरे नसून स्वच्छ भारत मिशनचे काम पाहणारे परमेश्वरन अय्यर होते. आयएएस झालेले परमेश्वरन १९८१ च्या उ.प्र. केडरमध्ये निवडले गेल्यानंतर त्यांची पहिली पदस्थापना डेहराडून जिल्ह्यात झाली होती आणि ते सातेली गावात आले होते. यापूर्वी स्वच्छता मिशनचे काम गुजरात केडरचे आयएएस विजयलक्ष्मी जोशी यांना सोपवले होते. पण दोन महिन्यांनंतर त्यांनीच नोव्हेंबर २०१५ मध्ये अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हा ठरविले गेले की तज्ज्ञाच्या स्वरूपात जागतिक बँकेत पदस्थ परमेश्वरन हेच यास उत्तमपणे निभावू शकतात आणि संपूर्ण देशाला २०१९ पर्यंत उघड्यावर शौचापासून मुक्त करू शकतात.  डेहराडूननंतर अय्यर बिजनौरमध्ये जिल्हाधिकारी होते. यानंतर वस्त्रोद्योग आणि संरक्षण मंत्रालयात सचिवही राहिले. आठ वर्षांपूर्वी ते जागतिक बँकेत गेले. जागतिक बँकेत असताना ते हनोई, वॉशिंग्टन, इजिप्त आणि लेबनॉनमध्ये स्वच्छता आणि पाण्याची समस्या सोडवत राहिले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, पहीलाच चित्रपट कान महोत्सवात, बुच यांची सेबीत नवी खेळी, संयुक्त राष्ट्राने मंजूर केला स्वमग्नतेवरील कायदा...   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...