आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प आणि ट्रुडो यांच्या भेटीतील ‘शेक हँड’चे फोटो नेटवर चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची नुकतीच व्हाइट हाऊसमध्ये प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीची चर्चा जगभरात आहे. 
 
कारण या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर अपलोड झाले आहे. या दोघांची हस्तांदोलनाची पद्धत, बॉडी लँँग्वेज याची चर्चा नेटिझन्समध्ये सुरू आहे.
 
अमेरिकेतील चित्रपट निर्माते मॅथ्यू ए चेरी यांनी सर्वप्रथम हा व्हिडिओ अपलोड केला. त्यानंतर त्यावर रिट्विट केले गेले. ‘आयकॉनिक’ असे शीर्षक देण्यात आलेल्या या छायाचित्रात ट्रुडो यांच्यासमोर ट्रम्प यांचे विचित्र हाव भाव दिसत आहेत.
 
 अनेक युझर्सनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहे, तर काही बहुतांश युझर्सनी ट्रम्प यांची तुलना अन्य राष्ट्राध्यक्षांशी केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...