आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष: 65% महिला थेट लग्नातच बघतात आपल्या आयुष्याचा जोडीदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गृहिणींची सद्य:स्थिती  
 
८४ % महिला कौटुंबिक स्तरावरचे निर्णय घेतात
-संपत्ती : बिहारमध्ये वास्तव्य असेल तर सर्वाधिक संपत्ती
 
- तुमच्या नावावर घर किंवा जमीन असेल तर देशातील ४० % महिलांमध्ये तुमचा समावेश होतो. जंगम-स्थावर मालमत्ता नावावर असणाऱ्या ४० % महिला देशात आहेत. राज्यवार विचार करता बिहार यात आघाडीवर आहे. येथील ५८.८ % महिलांच्या नावे संपत्ती आहे.  
 
- दुसऱ्या स्थानी मेघालय आणि त्रिपुरा आहे. येथे ५७.३% महिलांच्या नावावर संपत्ती आहे. राजस्थानमध्ये गेल्या ५ वर्षांत यात ९% (२० वर्षांत ४४% संपत्ती) वाढ झाली आहे. झारखंडमध्ये हा दर पाच वर्षांत ३० % झाला आहे. छत्तीसगडमध्ये ४३%, तर पंजाबमध्ये दरवर्षी ५७% रजिस्ट्री महिलांच्या नावे होतात.
 
  तुम्ही  या ५% पैकी आहात का? 
५%मुली आपल्या आवडीप्रमाणे जोडीदार निवडतात.  
 
६५ % महिला आपल्या भावी जोडीदाराला विवाहाप्रसंगी पहिल्यांदा पाहतात. यात सर्वात वाईट स्थिती राजस्थानमध्ये आहे. येथे १% महिलाच पसंतीने जोडीदार निवडू शकतात.  
 
-सोने : मध्यमवर्गीय महिलांजवळ सरासरी १३८ ग्रॅम सोने  
 
- जगातील सर्वाधिक सोने भारतीय महिलांकडे आहे. सामान्य भारतीय महिलांजवळ सरासरी १३८ ग्रॅम सोने असते. भारतीय घरांमध्ये २० हजार टनांपेक्षा अधिक सोने आहे. जगातील एकूण
सोन्यापैकी हे ११% आहे.  
 
- एका सर्वेक्षणातून दिसून आले की महिला लग्नांमध्ये ३०-२५० ग्रॅम, दैनंदिन वापरासाठी  ५-३० ग्रॅम आणि हौसेखातर ५-२० ग्रॅम सोने खरेदी करतात.  
 
- महिला तीन प्रसंगांना सर्वाधिक दागिने खरेदी करतात (लग्नामध्ये २४ %, वाढदिवशी १५% आणि सणावाराला १२%). त्यातही मंगळसूत्र आणि बांगड्यांना (३०-४०%) सर्वाधिक मागणी आहे.  
 
- बचत  
५% महिलांजवळ ५ लाख रुपये  
- देशातील ५% महिलांच्या बचत खात्यावर अंदाजे ५ लाख रुपये आहेत.  
- २% पुरुषांच्या खात्यावरच ५ लाख रुपये आहेत. स्पेंडिंग बिहेव्हियर इन इंडिया (सर्व्हे) नुसार १९.२३% महिला आपल्या आणीबाणीच्या प्रसंगी खर्चण्यासाठी  ५० हजार रुपयांपर्यंत बचत करतात.  
 
-खाते  
६१ % महिलांकडे, १३% वाढ  
-२०१४ पर्यंत देशातील ४८ % महिलांजवळ स्वत:चे बँक खाते होते. पुढच्या एक वर्षात यात वाढ होऊन ६१% झाले.  
-७.७० कोटी महिला एका वर्षात बँकिंग प्रणालीत आल्या. ही वाढ जनधन खाते सुरू केल्यानंतर झाली आहे. सध्या देशात एकूण ३५.८ कोटी महिलांची बँक खाती आहेत.  
 
-गुंतवणूक  
२४ टक्के महिलांजवळ डीमॅट 
- देशात मार्च २०१५ पर्यंत १.०९ कोटी एकूण डीमॅट खातेधारक होते. त्यात २४ % महिला आहेत.  
- २३ % कामकरी महिला आपल्या गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय घेतात ही आश्चर्यकारक बाब दिसून आली. बाकी ७७ % महिला पती किंवा पालकांच्या निर्णयावर अवलंबून राहतात.
 
- धोरण  
२४ % महिलांचा विमा  
-  वैद्यकीय किंवा जीवन विमा असणाऱ्या २४ % च रिस्क कव्हर घेतात. सर्वात मोठी कमतरता याच क्षेत्रात आहे.  
-२०१४ च्या अहवालानुसार देशात केवळ १७ % लोकांजवळ वैद्यकीय विमा आहे. म्हणजे केवळ २१.६२ कोटी लोकांजवळ आरोग्य सुरक्षा सुविधा आहे.  
 
- निर्णय   
८४ % च्या हाती ही क्षमता  
- विवाहित महिलांच्या हातात घरातील निर्णयाची क्षमता एकवटली आहे. ८४% महिला असे करू शकतात. १० वर्षांपूर्वी ७६% महिलांच्या हाती ही क्षमता होती.  
- महिलांकडे निर्णयाची क्षमता वाढली असेल. मात्र, ४८ % महिलांना कौटुंबिक अडचणींमुळे करिअर सोडावे लागते.  
 
-व्यवसाय : १४% उद्योग महिलांच्या हाती  
देशात ५.८५ कोटी नोंदणीकृत व्यवसाय आहेत. पैकी १४ % बिझनेसवर महिलांची मालकी आहे. म्हणजे या महिला ८० लाख बिझनेस युनिटमध्ये १.३० कोटी लोकांना रोजगार देत आहेत. महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या बिझनेस युनिटमध्ये ८० % स्वत: भांडवल गुंतवणाऱ्या आहेत.  
 
- शिक्षण : आयआयएममध्ये १४ % वाढ, आयआयटीमध्ये मुलींची संख्या घटली 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, व्यावसायिक, शिक्षिकांना पुरुषांच्या बरोबरीने येण्यासाठी १६९ वर्षे लागली ... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...