आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाने हात नाकारले म्हणून रडत बसण्यापेक्षा तिने पायांचे बनविले हात; पाहा थक्क करणारा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी ८.०० वा. : दोन मुले, पती व त्या अशा चौकोनी कुटुंबाच्या स्वयंपाकाला त्या सुरुवात करतात. भाजी निवडतात, विळीवर कांदा कापतात, भाजी फोडणीला घालून शिजवतातही. पण हे सारे पायाने.. - Divya Marathi
सकाळी ८.०० वा. : दोन मुले, पती व त्या अशा चौकोनी कुटुंबाच्या स्वयंपाकाला त्या सुरुवात करतात. भाजी निवडतात, विळीवर कांदा कापतात, भाजी फोडणीला घालून शिजवतातही. पण हे सारे पायाने..
आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला सक्षमीकरण हा शब्द सगळीकडे वापरला जाईल. महिलांनी त्यांच्या मर्यादा भेदून सक्षम व्हावे, स्वत:तील उणिवा भरून काढाव्यात आणि गुणांचा विकास करावा असे सल्ले दिले जातील. त्याचवेळी नाशिकमधील अश्विनी कॉलनीत राहणाऱ्या सुनीता गवळींनी दोन्ही हात नसलेल्या जन्मजात उणिवेवर मात करून फक्त हिंमत आणि चिकाटी या भांडवलाच्या जोरावर धडधाकटांना लाजवील अशा त्यांच्या दिवसाला सुरुवात केली.

दोन हात नसलेल्या या माउलीने दोन पायांनाच त्यांचे हात बनवले. दोन मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन केले. कुटुंबातील सर्व कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर त्या तिथेच थांबल्या नाहीत. अपंगांच्या कोट्यातून आपल्याला नोकरी लागावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. आमदार, खासदारांकडे पाठपुरावा केला. महापालिका, रेल्वे आणि एचएल या संस्थांमध्ये त्यांनी शिपाई पदासाठी अर्ज केले, पण हात नाहीत हे कारण देऊन त्यांना नोकरी नाकारण्यात आली. आपल्याला नोकरी नाही मिळाली, पण इतर अपंगांचे हक्क तरी डावलले जाऊ नयेत, असे त्यांना वाटू लागले. म्हणूनच त्यांनी बहुउद्देशीय विकलांग संस्था स्थापली आणि आज या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून सात जणांच्या टीमसोबत त्या अपंगांसाठी काम करत आहेत... हात नसताना आपले काडीचेही काम अडत नाही हेच त्या सिद्ध करतात... पायानेच काडेपेटी वापरून देवाला दिवा लावतात... आणि कदाचित मनात एकच प्रार्थना करतात... धडधाकटांना बुद्धी दे...सुनीता गवळींची ही कथा... सर्वांनाच प्रेरणा देणारी...

(छाया : प्रदीप मोरे)
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटोज  आणि व्हिडिओ... दोन हात नसलेली ही माऊली कशाप्रकारे दोन पायांनाच हात बनवून संसार चालवते...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...