आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंपणच शेत खात अाहे! (दिल्ली वार्तापत्र)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकासाबाबत माेदींचा हेतू निर्मळ असला तरी वर्षभरात माेदी सहकाऱ्यांवर, पक्षकार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवणारे म्हणून अाेळखले जाऊ लागले.विराेधकांनाही हेच पािहजे हाेते. देश जिंकलेल्या बादशहाला अाेढणारे त्यांच्याच घरात तयार करण्यात काँग्रेसला यश मिळत गेले. स्मृती इराणी ते पंकजा मुंडेंची प्रकरणे बाहेर अाली ती भाजपच्याच लाेकांमुळे!
दिल्ली असाे वा महाराष्ट् , राजस्थान, मध्य प्रदेश किंवा अन्य काही राज्ये; भाजपसाठी २०१५ हे वर्ष शुभ नसल्याचे संकेत मिळत अाहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र माेदी जगाचे हृदयसम्राट हाेण्यासाठी अभिनव प्रयाेग करीत असतात; त्यांना जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळताे मात्र, पक्षातील नेत्यांनीच केलेले उपद्व्याप हाताळताना त्यांचा चांगलाच ‘याेगा’ हाेत अाहे. वर्षभरातच इतक्या समस्यांना सामाेरे जावे लागेल याचा विचारही माेदींनी केलेला नसावा. दहा वर्षांनंतर भाजपला सत्ता मिळाली, परंतु इतरांपेक्षा वेगळे करण्यासाठी धडपडत असणारे माेदी हे केवळ अमित शहा, अरुण जेटली, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, गुजरातेत अानंदीबेन या बाेटावर माेजू शकू एवढ्यांनाच घेऊन पुढे निघालेत.

देशाच्या विकासाबाबत माेदींचा हेतू निर्मळ असला तरी गेल्या वर्षभरात माेदी सहकाऱ्यांवर आणि पक्षातील कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवणारे म्हणून अाेळखले जाऊ लागले. विराेधकांनाही हेच पाहिजे हाेते. देश जिंकलेल्या बादशहाला अाेढणारे त्यांच्याच घरात तयार करण्यात काँग्रेसला यश मिळत गेले अाहे. स्मृती इराणी ते पंकजा मुंडे यासारख्यांची किमान २५-३० प्रकरणे बाहेर अालीत ती भाजपच्याच लाेकांमुळे! ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनात असलेली खदखद अाहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुराेिहत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र माेदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे काही बाेलले ते उघडकीस अाणले गेले. परंतु पुराेिहत चुकीचे काय बाेलले, याचेही चिंतन व्हावे. भाजपच्या असंख्य नेत्यांच्या मनात काहींच्या बाबत असूया निर्माण झाली अाहे. अायुष्य पक्षात घालवणाऱ्यांना माेदींनी काहीही दिले नाही अाणि जे माेदींजवळ अाहेत त्यातील बरेचसे वशिल्याने अाहेत, असा समज अनेकांचा झाला अाहे; त्यात तथ्य असावे म्हणूनच दर दाेन-चार दिवसांनी एखाद-दुसरे प्रकरण बाहेर निघत अाहे. या सर्वच प्रकरणांमध्ये पंतप्रधान माेदी अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका सारखीच दिसून येते. या दाेघांनीही ‘क्लीन चिट’ नावाचा शिक्का तयार करून ठेवलेला अाहे. प्रकरण अाले की शिक्का मारायचा आणि दुसऱ्या कामाला लागायचे या धाेरणामुळे कार्यकर्ते पुन्हा डिवचले जात अाहेत. प्रकरणे, घाेटाळे उकरून काढणारे हे विराेधी पक्षातील नेते अाहेत हे सकृतदर्शनी दिसत असले तरी या प्रत्येक प्रकरणाचा जाब हा भाजपच्याच अस्वस्थ नेत्यांना, कार्यकर्त्यांना हवा अाहे. त्यांची कुकरसारखी अवस्था झाली अाहे. भावना किती दाबून ठेवायच्यात यालाही मर्यादा असतात, एकेकाची प्रकरणे बाहेर येणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या कुकरसारख्या शिट्या अाहेत. ही अाता सुरुवात झाली अाहे. जाेपर्यंत कार्यकर्त्यांना पक्षात माेकळा श्वास घेता येणार नाही ताेपर्यंत हे असेच चालणार अाहे. सातत्याने वादग्रस्त असलेले भाजपचे नेते संजय जाेशी यांनी त्यांच्यावर हाेत असलेल्या अन्यायाची धडक माेहीमच सुरू केली अाहे.

कट्टर हिंदुत्ववादी असलेले जाेशी यांनी पक्षातील भल्याभल्यांना घाम फाेडला अाहे. लालकृष्ण अडवाणी मंत्री असताना जाेशींचा त्यांना फटका बसला हाेता. संजय जाेशी यांना पक्षात पुन्हा सन्मानजनक स्थान मिळावे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न असतात. परंतु नरेंद्र माेदी अाणि अमित शहा यांनी जाेशी यांना लांब ठेवले अाहे. संजय जाेशी यांना जवळ करणे म्हणजे अागीशी खेळणे असे या नेत्यांचे मत झाले अाहे. अापल्याला जवळ करीत नाही म्हणून जाेशी आणि त्यांचे समर्थक माेदी-शहांचे उणदुणे काढण्यात जराही मागचा-पुढचा विचार करीत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून संजय जाेशींच्या माध्यमातून पाेस्टर वाॅर सुरू अाहे. पक्षातील मतभेद चव्हाट्यावर अाणणारे पाेस्टर अकबर राेडवरील अमित शहांच्या दिल्लीतील बंगल्यासमाेर लावण्यात अाले अाहे. एरवी अशा पाेस्टरवर केवळ संजय जाेशी यांचे नाव असायचे. या वेळी मात्र सत्तरच्या वर समर्थकांची नावे लिहिण्यात अाली अाहेत. याचाच अर्थ भाजपमध्ये माेदी-शहांच्या विचारांना विराेध करणाऱ्यांची अाणि काेणालाही न घाबरता स्वत:ची नावे जाहीर करणाऱ्यांची संख्या वाढत अाहे. या पाेस्टरवर ‘पािकस्तान, बांगलादेश काे रमजान पर देते हाे बधाई; सुषमा, अाडवाणी, संजय जाेशी, राजनाथ, गडकरी, मुरली मनाेहर जाेशी, वसुंधरा के लिए मन में है खटाई; ना संवाद, ना मन की बात, ना सबका साथ, ना सबका विकास, फिर क्याें करे जनता अाप पर विश्वास.’ असा मजकूर लिहिला अाहे. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेले नैराश्य अमित शहांना सकाळी उठल्या उठल्याच त्यांच्या बंगल्यासमाेर पाहायला मिळत अाहे. पक्षातील कार्यकर्त्यांप्रमाणेच भाजपचे खासदारही नाराज अाहेत.

राज पुराेिहतांसारखेच हे खासदार नेत्यांविषयी भरभरून बाेलतात. केंद्रातील मंत्री अद्यापही स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत. सुरुवातीला सकाळपासून रात्रीपर्यंत मंत्र्यांना काम करावे लागत असे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या कार्यालयातून मंत्र्यांचा अाढावा घेतला जात असे. परंतु कामच नसल्याने अनेक मंत्री अािण बहुतांश राज्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात फिरत असतात. पंतप्रधान कार्यालयाकडून अाढावा घेणेही केव्हाचे बंद झाले अाहे. माेदी-शहांना या सगळ्यांचे रुसवेफुगवे दूर करावे लागतील. अन्यथा या वर्षात भाजपमध्ये नुसता गाेंधळच पाहायला मिळणार अाहे. पावलाेपावली राज पुराेिहत अाहेत हे दुर्लक्षित करून चालणार नाही. तशातून संसदेचे पावसाळी अधिवेशन जवळ येत अाहे. विराेधकांकडे खूप विषय अाहेत. सुषमा स्वराजांपासून तर वसुंधराराजेंपर्यंत विराेधकांच्या रडारवर असणार अाहेत. यातच भर म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अाणीबाणीची शक्यता व्यक्त केली अाहे. नरेंद्र माेदींना सभागृहात शांत बसून चालणार नाही, माैन ताेडावे लागेल. तर बाहेर अमित शहांना संजय जाेशींसारख्या पक्षाच्या निष्ठावंतांचा सामना करावा लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...