आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हो या देशात महिलांचा सन्मानच होतो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माेबाइलशी लीलया खेळतात, हाताळतात, वापरतात! ते सत्तेत अाल्यापासून तंत्रज्ञानावरच अधिक भर देताना देशाने पािहले अाहे. त्यांच्या या मायावी अाभासात शेतकरी-कष्टकरी, हरिजन-गिरीजनांच्या समस्या अत्यंत गाैण झालेल्या अाहेत. त्यांना यातील काही प्रश्नांना हात घालायचा असला तरी त्यांचा स्मार्टफाेन केव्हातरी डाेकावताना दिसताे आणि मूळ प्रश्न मागे राहून बातम्यांचे हेिडंगच त्यांच्याकडून क्लिक हाेणा-या करामती ठरतात.

या देशातील तंत्रज्ञानच अाम्हाला तारुण नेईल यावर ठाम राहत माेदींनी अनेक संवेदनशील बाबींना सेल्फीचे अावरण घातले अाहे. ‘मन की बात’ करताना त्यांनी ‘सेल्फी विथ डाॅटर’ ची कल्पना मांडली. अापल्या मुलींसाेबत फाेटाे काढा अािण अपलाेड करा हे त्यांचे सांगणे अाहे. यामुळे म्हणे मुलींचा सन्मान वाढणार अाहे. माेदींच्या काेणत्याही शब्दाला अमृतवाणी म्हणत अगदी गुलाबासारखे झेलणा-या कार्यकर्त्यांच्या टाेळ्या निर्माण झालेल्या अाहेत. साेशल मीिडयावर जर माेदींच्या एखाद्या अमृतवाणीला विराेध केला तर वावटळीसारख्या वाढलेल्या या निर्बुद्ध टाेळ्या अत्यंत हिणकसपणे अाक्रमक हाेतात. या देशात प्रत्येकाला अापले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अाहे हे मानायला या गुंड मानसिकतेच्या टाेळ्या तयार नाहीत. ‘सेल्फी विथ डाॅटर’ बाबतही असेच झाले. अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. तर काहींनी केवळ मुलीसाेबत फाेटाे काढून त्यांना सन्मान मिळणार अाहे का? त्यांच्या सुरक्षेचे काय? त्यांचे अभिमानाने जगणे यातून साध्य हाेणार अाहे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. माेदी ज्या तंत्रज्ञानाला प्राथमिकता देतात त्याचाच वापर करीत अनेकांनी साेशल मीिडयावर हे प्रश्न लिहिले. ज्यांनी या विषयावर चिंतन करायला लावणारे विचार मांडले त्यास माेदीप्रेमींनी अत्यंत खालच्या स्तरावर उत्तरे दिलीत. यात केवळ पुरुष हाेते असे नाही, ज्यांना सन्मान मिळावा असे माेदींना वाटते त्या महिलासुद्धा अगदी खालच्या स्तरावर उतरू शकतात हे माेदींच्या नव्या तंत्रज्ञानातून दिसून अाले. अभिनेत्री श्रुती सेठ हिलाही माेदीभक्तांचा वाईट पद्धतीने सामना करावा लागला. केवळ सेल्फी काढून मुलींचा सन्मान वाढविला जाऊ शकत नाही? हा देशातील शंभरावर काेटी लाेकांच्या मनात अालेला प्रश्न तिने माेदी तंत्रज्ञानाचा वापर करून टि्वटरवर पाेस्ट केला. तिला तब्बल दाेन दिवस अपमानाजनक वागणूक देण्यात अाली. काही महिलांनी तिला वेश्याची उपमा दिली. हे म्हणे सुसंस्कारीत माेदी भक्त. एवढ्या नकारात्मक अािण मनस्ताप देणा-या प्रतििक्रया काेणत्याही सरकारमध्ये उमटल्या नव्हत्या. स्वत:ला सुसंस्कारीत म्हणणा-या लाेकांकडूनच असे का घडते? माेदींवर केलेल्या नकारात्मक टीकेवर हे लाेक सातत्याने तुटून पडत असतील तर भाजप सरकारमध्ये भाडाेत्री गुंडांच्या टाेळ्यांमध्ये झपाट्याने वाढ हाेत असल्याबद्दल संशय निर्माण हाेताे.

ज्या माेदींना मुली अािण महिलांबद्दल प्रेम वाटते, त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी असे वाटते त्या विचाराचा प्रत्येक भारतीयांनी अादर करायला पािहजे. माेदींच्या कृतीतून ते गेले काही दिवसांमध्ये दिसून अाले अाहे. ललित माेदी प्रकरणी देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, पदवीप्रकरणी देशाच्या मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी अािण चिक्की प्रकरणात नाव कमावलेल्या पंकजा मुंडे या सगळ्यांची प्रकरणे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शांतपणे सहन केली. या प्रत्येकीचीच गाेष्ट काेटी माेलाची असल्याचे त्यांना कळते परंतु त्यांनी या सगळ्यांना क्लिन चिट दिली अाहे. कारण त्या महिला अाहेत?. माेदींनी ताेंड उघडले नसले तरी राजनाथ सिंग, अरुण जेटली अािण देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या महिला मंत्री निर्दाेष असल्याचे देशाला सांगितले. माेदींकडून हा महिलांचा सन्मानच म्हणायला पािहजे. माेदी एवढा सन्मान करीत असतानाही अभिनेत्री श्रुती सेठ प्रश्निचन्ह उभे करीत असेल तर भाजपमध्ये सुसंस्कारीत झालेल्या महिलांचा मानसिक ताेल जाऊ शकताे. हा ताेल किती जाताे हे श्रुतीने स्वत:च कथन केले अाहे. माेदींना महिलांबद्दल इतका पुळका अाता यायला लागला अाहे. मात्र, थाेडे इतिहासात गेले तर त्यांच्या कृतीत संभ्रम असल्याचे दिसून येते. नरेंद्र माेदी हे तब्बल १४ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री हाेते. या काळात सतत राबविल्या जाणा-या ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या अभियानामुळे देशातील सगळ्याच राज्यात हजार मुलांमागे मुलींची संख्या वाढायला लागली अाहे. यात सर्वात मागे हाेते ते गुजरात राज्य. माेदींनी या अभियानाकडे कधीही लक्ष न दिल्याचा ठपका नियंत्रक व महालेखा परीक्षकाकडून ठेवला. राज्यात हजार मुलामागे मुलींची संख्या ८३१ अाहे. लिंगचाचणी राज्यात सर्वाधिक हाेत असल्याचे गुन्हे दाखल केले असल्याचेही कॅगने निदर्शनास अाणून दिले अाहे. नरेंद्र मोदी हे १४ वर्षांत गुजरातमधील प्रत्येक महिलांसाठी शौचालयांची व्यवस्था करू शकले नाहीत. गुजरातमधील सहा काेटी लाेकांपैकी अडीच काेटी लोक उघड्यावर शौचास जातात. महिलांच्या अादराच्या गाेष्टी करणारे माेदी लाल किल्ल्यावरून तालासुरात
बाेलताना ओघात ‘बेताल’ तर बोलून गेले नाहीत? हा प्रश्न निर्माण हाेताे.