आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विगमोर हॉलमध्ये रविशंकर, अमजद अलींनंतर सादरीकरण करणारे भारतीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी संगीताची साधना सुरू केली होती. चेन्नईमध्ये जन्मलेले संजय यांची गायनासाठी जगभर ओळख आहे. संजय यांचे लहानपण कोलकात्यात गेले. वडिलांची नोकरी होती. आजी-आजोबा तिथेच राहत होते. एके दिवशी त्यांचे काका सुरेश यांनी संजयमध्ये संगीताचे इतरांपेक्षा वेगळे गुण हेरले. दोन वर्षांचे असताना ते ऐकलेले संस्कृत श्लोक त्याच शैलीत म्हणत होते. त्यांनी व्ही. लक्ष्मीनारायणन यांच्याकडून व्हायोलिनचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. एके दिवशी सायकलीवरून त्यांच्याकडे जात असताना अपघात झाला आणि मनगटाला मार लागला. त्यामुळे व्हायोलिनऐवजी गायनास सुरुवात केली. रुक्मिणी राजगोपाल त्यांचे आठ वर्षे गुरू होते. त्यांची आत्या असलेल्या रुक्मिणी यांचे शास्त्रीय गायनात मोठे नाव होते.

२००३ ची घटना आहे. तरुणांचा एक कार्यक्रम होणार होता. तरुणांचा कल शास्त्रीय संगीतामध्ये नाही, असे मानले जात होते. मात्र, संजय यांचे गायन ऐकण्यास सुरुवात केल्यानंतर त्या मंत्रमुग्ध झाल्या. विद्यानिकेतन पब्लिक स्कूलच्या सभागृहात नीरव शांतता पसरली. तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगती झाली तरी पारंपरिक गोष्टीची कायम छाप पडते हे तेव्हा पस्तिशीत असलेल्या संजय यांना उमगले. त्यांना तंत्रज्ञानाची चांगली समज होती. संगीत डॉट कॉम नावाची त्यांची वेबसाइटही आहे. १९८६ मध्ये त्यांचा पहिला कार्यक्रम होता. एस. सुब्रह्मण्यम यांच्या नावाने तो प्रचलित झाला होता. त्यांचे काही जवळचे मित्र त्यांना सुब्रा संबोधतात. संगीत जगतात त्यांची सुब्रा म्हणून ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी लंडनच्या विगमोर हॉलमध्ये शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम करणारे ते तिसरे भारतीय ठरले. त्याआधी पंडित रविशंकर व अमजद अली खान यांनी सादरीकरण केले.

- संजय सुब्रह्मण्यम, प्रसिद्ध गायक
- जन्म- २१ जानेवारी १९६८
- शिक्षण - विवेकानंद कॉलेज, चेन्नईमधून बी.कॉम.,आयसीडब्ल्यूएचे ग्रॅज्युएट मेंबर, आयसीएआयचे फेलो सदस्य
- कुटुंब- पत्नी आरती, दोन मुले
- चर्चेत - त्यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
बातम्या आणखी आहेत...