Home »Divya Marathi Special» Next Month In Austrilya No Mockdonald

पुढील महिनाभर ऑस्‍टे‍लियात मिळणार नाही मॅकडोनाल्‍डस

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 12:01 PM IST

  • पुढील महिनाभर ऑस्‍टे‍लियात मिळणार नाही मॅकडोनाल्‍डस


या महिन्यात तुम्ही ऑस्ट्रेलियात गेलात तर तुम्हाला मॅकडोनाल्ड मिळणार नाही. कारण तिथे या महिन्यात मॅकडोनाल्डला ‘मॅकाज’ म्हटले जाणार आहे. इंटरनॅशनल फास्ट फूड जॉइंट मॅकडोनाल्ड्सने ऑस्ट्रेलियातील दुकानांचे नाव आता ‘मॅकाज’ असे ठेवले आहे. कारण ऑस्ट्रेलियातील लोक मॅकडोनाल्डला आधीपासूनच या नावाने संबोधत होते. 26 जानेवारीला ऑस्ट्रेलिया दिवसानिमित्त कंपनी साइन बोर्डवर महिनाभरासाठी हेच टोपणनाव लावणार आहे. ऑस्ट्रेलियातील 50 टक्के लोक मॅकडोनाल्ड्सला ‘मॅकाज’ या नावाने संबोधतात. तेथे अशी शॉर्ट आणि टोपणनावे फार लवकर प्रचलित होतात. एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार ‘फुटी’नंतर मॅकाज हा सर्वात जास्त ओळखला जाणारा शब्द आहे. तेथे फुटबॉलला ‘फुटी’ हे टोपणनाव देण्यात आले आहे. तसेच एकतृतीयांश लोकांनी कंपनीच्या ऑनलाइन व्हर्जनमध्येही ‘मॅकाज’ नाव द्यायला सांगितले होते.

reuters.com

Next Article

Recommended