आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

399 वेळा डावलले, नंतर मिळाली होती ‍निकेश अरोरा यांना पहिली नोकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकेश अरोरा : सॉफ्ट बँकेचे वर्तमान उपाध्यक्ष
पत्नी : आयशा थापड, इलेक्ट्रॉनिक यूथ मीडिया ग्रुपच्या सीईओ. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा
शिक्षण : इलेक्ट्रिकल इंजिनिअर, एमबीए
चर्चेचे कारण : 10 वर्षांपर्यंत मुख्य व्यावसायिक अधिकारी या पदावर काम केल्यानंतर गुगलचा राजीनामा देऊन सॉफ्ट बँक कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाले.
विप्रो कंपनीत 9 महिने नोकरी केल्यानंतर 1990 मध्ये निकेश एमबीएसाठी अमेरिकेत गेले. वडिलांनी बोस्टनच्या नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटीत शुल्क भरले. मात्र, राहण्याची सोय निकेश यांना स्वत:च करावी लागणार होती. बोस्टनमध्ये भटकत असताना ते एका भारतीय हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे एका भारतीयाने त्यांना रात्रभर राहण्यास जागा दिली. सकाळी चार भारतीय युवकांनी त्यांना सर्वांसाठी स्वयंपाक बनवण्याच्या अटीवर आपल्या खोलीत राहण्यास घेऊन गेले. खोलीतील सहकार्‍यांसाठी स्वयंपाक बनवणारे निकेश लवकरच विद्यापीठातही वाहवा मिळवू लागले. त्यांचे प्राध्यापक हर्लेन प्लेट निकेश यांना सर्वोत्तम विद्यार्थी मानायचे. माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला तू तयार आहेस?, असे हर्लेन यांनी निकेशना एकदा विचारले होते. त्यावर निकेश यांनी नुसती मान हलवली व निघून गेले. मात्र, त्यानंतर ज्या प्रश्नाचे उत्तर कोणाला येत नसेल, त्याचेच उत्तर देण्याची सवय त्यांनी लावून घेतली. निकेश यांनी अमेरिका येण्यासाठी घेतलेल्या कष्टांपेक्षाही जास्त कष्ट नोकरी शोधण्यासाठी घेतले. फायनान्सबद्दल माहिती नसल्याचे सांगत त्यांना 399 कंपन्यांनी रिजेक्ट केले होते. त्यानंतर फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये नोकरी मिळाली. फायनान्स समजून घेण्यासाठी बोस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दिवसा नोकरी व रात्री कॉलेज करत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 1995 मध्ये चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट अभ्यासक्रमही पूर्ण केला.