आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन, टाटा देणार नीलमच्या पुस्तकाला अर्थसाह्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलम यांचे बालपण मॉस्कोत गेले. त्यांचे आई-वडील दोघेही मॉस्कोतील भारतीय दूतावासात भाषांतरकार होते. त्यामुळे नीलम यांचे ६ वर्षे शिक्षण रशियन शाळेत झाले. पुस्तकाऐवजी त्यांना निसर्गाद्वारेच शिकवले जात होते. आई-वडिलांसह भारतात परतल्यानंतर त्यांना इंग्रजी शाळेत घातले.
 
इंग्रजी येत नव्हते. ही मुलगी खूप ‘डल’ आहे, ती इंग्रजी कधीही शिकू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी नोंदवली. नीलम यांनी नंतर इंग्रजी साहित्यात बी. ए. (ऑनर्स) करून इंग्रजीत चार पुस्तकं लिहिली.  पस्तिशीतच पतिवियोगाचे दु:ख सहन करावे लागले. १९९६ मध्ये कर्करोग झाला. तेव्हापासून त्या पुस्तकं लिहून कर्करोगाबाबत जागरूक करत आहेत.
 
२०१३ मध्ये पुन्हा कर्करोग झाला, पण त्यांनी पुन्हा त्याला हरवले. त्या सांगतात, मुंबईच्या डॉक्टरांमुळे मी वाचले. त्यानंतर लोकांना कर्करोगाबद्दल जागरूक करण्यासाठी त्यांनी स्वत:वर केंद्रित पुस्तकं लिहिण्यास सुरुवात केली, पण २०१३ मध्ये पुन्हा कर्करोग झाला. या वेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि पुन्हा जोमाने पुस्तकांचे काम सुरू केले.  
 
वय- ५७ वर्षे  
वडील : ओ. एन. पंचलर, आई : ऊर्मिला  
शिक्षण : बी. ए., अॅरिझोना विद्यापीठातून पत्रकारितेमधील पदव्युत्तर पदवी.  
कुटुंब : पती नाहीत, मुलगा : रजनील, मुलगी : अभिलाषा.
चर्चेत का?- त्यांच्या पुस्तकाला अमिताभ, टाटा निधी देणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...