आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Turmoil Put BJP Behind The Lime Light Nitin Gadkari Will Save It

वाचा, नितीन गडकरी ठरतील BJP चे तारणहार, की पक्ष जाईल सत्तेबाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील सत्ता समिकरणे आणि राजकीय घडामोडी बघितल्यावर भाजपची प्रतिमा काहिसी मलिन झाल्याचे दिसून येत आहे. याचा फटका विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बसला आहे. अशा वेळी निराशेच्या गर्तेतून भाजपला कोण बाहेर काढू शकेल याचा विचार केला तर एकच नाव पुढे येते आणि ते म्हणजे नितीन गडकरी.
गडकरी यांनी कॉंग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भात भाजपला मजबूत केले. नागपुरच्या महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विदर्भात भाजप कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली. युतीच्या शासन काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे सारखा आदर्श रस्ता तयार करुन दाखवला. आता गडकरीच भाजपचे तारणहार म्हणून पुढे येतील, असे चित्र तयार झाले आहे. अन्यथा भाजपची आणखी वाईट स्थिती झालेली दिसून येण्याची शक्यता जास्त आहे.
भाजपच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी नितीन गडकरी यांनी चांगली फिल्डिंग लावली होती. राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून नेते, कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती. त्या स्वरुपाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरवात झाली होती. पण कदाचित केंद्रिय नेत्यांच्या लक्षात ही बाब आली असावी. त्यांनी गडकरी यांना वेळीच शांत केले. नाही तर गडकरी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक होती. त्याची कारणेही तेवढीच स्पष्ट होती.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, नितीन गडकरी मुख्यमंत्रीपदासाठी कसे ठरले असते योग्य उमेदवार... जाणून घ्या त्यांची बलस्थाने... त्यांनी भाजपला कसे रुजवले विदर्भात...