आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तेसाठी गरज आहे कुशलता, स्थानिकता आणि नावीन्याची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विसावे शतक अमेरिकेचे होते. 21 वे शतक हे जागतिक शतक आहे. हे एक असे शतक आहे की, जेथे अनेक देशांचे तसेच क्षेत्रातील उद्योगपती आणि कार्यकारी अधिकारी जगाच्या अर्थव्यवस्थेला आकार देतील. 1988 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये 10 केस स्टडींपैकी 9 केस स्टडी अमेरिकन कंपन्यांवर होत होत्या. गेल्या वर्षी सुमारे 250 केस स्टडीज झाल्या. त्यात अर्ध्याहून अधिक गैरअमेरिकन कंपन्या होत्या. हा एक फार मोठा बदल आहे. आज भारतीय कंपन्या जागतिक कंपन्यांशी स्पर्धा करतात ते पाहून फार छान वाटते. भारतीय कंपन्यांचा उदय कसा झाला, आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या बरोबरीने त्या कशा उतरल्या हे पाहण्यापेक्षा नव्या जागतिक शतकात उद्योगांमध्ये गुणवत्ता कशी निर्माण होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच्या तीन पद्धती आहेत. एक म्हणजे कुशलता, स्थानिक गरजांप्रमाणे स्वत:मध्ये बदल करणे आणि नावीन्य. पहिल्या दोन प्रकारांमध्ये भारतीय पुढे आहेत. गरज आहे ती काही तरी नावीन्य आणण्याची. 1991 मध्ये जेव्हा आर्थिक उदारीकरण सुरू झाले तेव्हा जागतिक स्पर्धेबाबत भारतीय कंपन्या साश्ांक होत्या. पण त्यांनी पुढे खरेच कमाल केली. विप्रा, इन्फोसिस आणि टीसीएस कंपन्या ही त्यांची उदाहरणे आहेत. टाटा मोटर्ससारख्या अन्य क्षेत्रांतील कंपन्यांनी हे साबीत केले की, जागतिक संधीचा फायदा घेण्याइतपत भारतीय कंपन्या सक्षम आहेत.
विसाव्या शतकात अमेरिकन कंपन्यांना ज्या संधी होत्या तशा संधी भारतीय कंपन्यांना भारतातच उपलब्ध आहेत. याचा फायदा घेत त्यांचा अन्य बाजारातही शिरकाव होऊ शकतो. फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यांनी नावीन्यावर जोर देणे गरजेचे आहे. अमेरिकन कंपन्यांनीही नावीन्याच्या आधारेच सफलता मिळवली. जागतिक शतकात नावीन्याच्या आधारे विजेता बनण्यासाठी अनेक संधी आहेत. जागतिक पातळीवरील ग्राहकांसाठी नव्या सेवा आणि उत्पादने तयार करणे तसेच कमीत कमी साधने आणि सगळ्यात कमी किमतीत सध्याच्या गरजा पूर्ण करणे या माध्यमातून नावीन्य येऊ शकते. भारतातील पिरामल लाइफ सायन्स आणि बायोकान या कंपनीने जागतिक बाजारात पेटंटची नवी औषधे बाजारात आणली आहेत. ती जर यशस्वी झाली तर नावीन्याच्या क्षेत्रात भारताची क्षमता सिद्ध होईल.
आणखी एक नावीन्य म्हणजे बचत करण्याचे नावीन्य. दारिद्र्यरेषेखाली जगणा-या कोट्यवधी लोकांच्या गरजा यामुळे पूर्ण होतील. ते समृद्ध होऊ शकतील. भारतातील नारायण हृदय रुग्णालय हे अशाच नावीन्याचे उदाहरण आहे. कमी दरात हृदयाच्या शस्त्रक्रिया कशा करता येतात हे या रुग्णालयाने दाखवून दिले आहे. महागडा उपचार केल्यानंतर जे फायदे होतात तसेच फायदे या उपचाराने होतात. टाटा कंपनीची नॅनो कार हे बचतीच्या नावीन्याचे मोठे उदाहरण आहे.