आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यायामानंतर वेदनांची चिंता करू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यायाम किंवा योगासने केल्यावर काही दिवसांनंतर सांधेदुखी जाणवल्यास फार चिंता करू नका. तुम्ही प्रथमच असा व्यायाम किंवा योगासने केली तर असे दुखणे साहजिक आहे. पण यासाठी एखादी वेदनाशामक गोळी घेऊ नका.
कोणताही शारीरिक आजार नसलेल्यांसाठी तसेच केवळ निरोगी राहावे म्हणून व्यायाम करणा-यांसाठी हा उपाय आहे. कोणत्याही प्रकारे शरीर ताणले गेल्यास शरीराला वेदना जाणवतात. अशा वेदनेला ‘मायक्रो टीयर्स’ असे म्हटले जाते. यामुळे तलम पेशींवर परिणाम होतो. याला ‘डोम्स’ (डीलेड ऑनसेट ऑफ मस्क्युलर सोरनेस) असे म्हटले जाते. यामुळे खांदे, छाती आणि दंडांवर जास्त परिणाम दिसून येतात. अशा वेदना 24 ते 28 तासांत कमी होतात.


या वेदना 72 तासांत कमी झाल्या तर ठीक, अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. एक दिवस आराम आणि नंतर झीज भरून काढणे आवश्यक आहे. पण आनंद मिळण्यासाठी शरीराला जास्त ताण दिल्याने या वेदना होत आहेत, हे लक्षात ठेवा. अनेक वेळा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप शारिरीक मेहनत करतो. भरपूर वजन उचलणे किंवा वेगाने धावणे यापैकी काहीही करताना शरीराची ठेवण आणि प्रकृती लक्षात घेतली पाहिजे.


शरीराच्या प्रकृतीचा विचार न करता व्यायाम केला तर वेदना होऊ शकतात. तसेच शरीरातील लॅक्टिक अ‍ॅसिड वाढल्यामुळेही वेदना होऊ शकतात. व्यायाम कमी केला असेल तर कमी वेदना होतात आणि शरीरही शांत राहते. आहारावर नियंत्रण ठेवल्यास थकवा कमी जाणवतो. त्यामुळे दैनंदिन आहारात फळे आणि भाज्यांचे
प्रमाण वाढवा.

- प्रिव्हेन्शन मॅगझीन