आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

divyamarathi.comवर उद्यापासून \'नो फेक न्यूज\', जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या बातम्यांचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक बातम्या खऱ्या आहेत की खोट्या, याबाबत कायम शंका असते. या बातम्यांत दिल्या जाणाऱ्या संदर्भाचा आधार खोटा असला तरी लोकांना ह्या बातम्या खर्‍या वाटतात. यामुळे अनेकदा नुकसान होते. अशा बातम्या सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याने अनेकांवर लाजिरवाणा प्रसंग ओढवला असेल.

बातम्यांतील दावे आणि त्यातील सत्य वाचकांपर्यंत पोहोचावे म्हणून divyamarathi.com वर अशा बातम्या प्रसिद्ध होणार नाहीत. शिवाय, या खोट्या बातम्यांतील सत्य आम्ही उघडकीस आणू. यानुसार, दैनिक दिव्य मराठीच्या वेबसाइटवर आपण वाचू शकाल ‘दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन’. या बातम्यांमुळे लोकांची दिशाभूल तर होत नाही ना, हे पडताळून मुळापर्यंत जाऊन आम्ही सत्यांश तपासू खरे चित्र वाचकांसमोर मांडू. 
 

अशा फेक न्यूजमुळे किती नुकसान होऊ शकते? 
गेल्या वर्षी अनेक राज्यांत मिठाची टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरली होती. यानंतर काही तासांतच मीठ 400 रुपये किलो दराने विकले जाऊ लागले. उत्तर प्रदेशात तर चेंगराचेंगरी होऊन एक महिला दगावली. दिल्लीत बसची तोडफोड झाली. केंद्र सरकारने यावर खुलासा केल्यावर वातावरण शांत झाले.

मंगळवारपासून आम्ही divyamarathi.com वर अशा व्हायरल फेक न्यूजमधील सत्य नियमितपणे आपल्यापर्यंत पोहोचवू. 
या उदाहरणांवरून जाणून घ्या व्हायरल झालेल्या बातम्यांमागील सत्य...

# 1) नुकतीच ही बातमी व्हायरल झाली होती. ती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन दौर्‍यावर असताना ते व्हाइट हाऊसवर पोहोचले. सुरक्षारक्षकाने त्यांच्या पत्नीसाठी कारचा दरवाजा उघडला. इनव्हेस्टिगेशनमध्ये समोर आले की, सुरक्षारक्षकाने मोदींच्या पत्नीसाठी नव्हे तर व्हाइट हाऊसच्या शिष्टाचाराचा भाग म्हणून दरवाजा उघडला होता. दरम्यान, मोदींनी 2016 मध्ये अमेकेचा दौरा केला होता. तेव्हा ही घटना घडली होती.

# 2) GST देशभरात लागू झाल्यानंतर ही बातमी व्हायरल झाली होती. पुजेचे साहित्यावर 18 टक्के टॅक्स लागेल. मात्र, मांस आणि मद्य टॅक्स फ्री करण्‍यात आले आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेले की अगरबत्ती-धूपबत्ती वगळून अन्य पुजेचे साहित्य सरकारने जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवले आहे. अर्थात ते टॅक्स फ्री केले आहे. त्याचप्रमाणे कच्चे मांस वगळून इतर मांसपर 12 ते 18 टक्के टॅक्स निर्धारित केला आहे.

# 3) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मेसेजमध्ये सांगण्यात आले होते की, पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक न केल्यास 1 जुलैपासून पॅन कार्ड रद्द करण्‍यात येतील. इतकेच नाही तर तुमचा मासिक पगार रोकला जाऊ शकतो. मात्र, तसे काहीच नाही. या सगळ्या अफवा होत्या. 1 जुलैनंतर पॅन कार्ड रद्द झाले नाही. ITR रिटर्न भरण्यासाठी 1 जुलैपर्यंत पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करणे गरजेचे होते.
बातम्या आणखी आहेत...