आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100% नो निगेटिव्ह: एक भेट 11 हजार व्होल्ट विद्युतप्रवाहाला मात देणाऱ्या पायलशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलवरच्या मुंडवालाकला गावच्या शाळेतील मैदानावर धावणारी पायल १० महिन्यांपूर्वी ११ हजार व्होल्टच्या विद्युततारेत अडकली होती. त्यामुळे तिचे दोन्ही हात कापावे लागले. या अपघाताच्या फक्त १८ महिन्यांनंतरच पायलने पायाने लिहायला सुरुवात केली. ऑक्टोबर महिन्यात तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत; पण तिने शाळेत जायला सुरुवात केली आहे. आई मनीषा आणि वडील धर्मवीर सांगतात की, घराजवळील शेतात लोंबकळत्या वीज वाहिनीमुळे हा अपघात घडला. एवढा मोठा अपघात होऊनही पायलच्या एका हास्याने आम्हाला बळ दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका तनीषा म्हणाल्या, पायलच्या डोक्याची जखम अद्याप भरलेलीही नाही. अशा स्थितीत आराम करायचे सोडून पायल शाळेत येण्याचा हट्ट करते. शिक्षणात अन्य विद्यार्थ्यांपेक्षा ती सरस आहे. पायाने लिहिता यावे म्हणून वर्गात तिच्यासाठी खाली बसण्याची सोय केलेली आहे. तिला वर्गमित्रांकडूनही मदत मिळत आहे.
मजकूर : संदीप शर्मा |छायाचित्र : योगेंद्र गुप्ता
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा,
तीन मिनिटे सकारात्मक बातमी वाचनातून अनेक तास चांगला राहतो मूड..,