आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्यांनी नव्हे नेत्यांनी कराव्या जाहिराती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवकणांचा शोध लागल्याने सगळ्या जगात चर्चेला उधाण आले आहे. मात्र असे असले तरीही टीव्हीचे रिमोट हाच जगातील सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचे मी मानते. टीव्हीवरील कार्यक्रमांच्यामध्ये जाहिरातींसाठी प्रत्येक वेळी ब्रेक येतो, तेव्ही मी लगेच चॅनेल बदलते.
क्रिकेट व बॉलीवूडमधील तारे-तारकांना टीव्हीवर खाण्यापिण्याच्या वस्तु विकताना पाहणे मला सहन होत नाही.
भारतीय क्रिकेटपटुंच्या जाहिराती पाहताना मला प्रचंड राग येतो. गेल्या काही दिवसातील त्यांची कामगिरी अत्यंत सुमार होती. क्रिकेटपटूंनी अभिनय करण्याऐवजी खेळाच्या सरावावर अधिक लक्ष द्यायला हवे असे तुम्हालाही वाटते का? तसेच त्यांनी जाहिरातींमध्ये चिप्स खाऊ नयेत व शीतपेये पिऊ नयेत. कारण त्यामुळे त्यांची चरबी वाढेल व धाव काढण्यासाठी दोन्ही यष्ट्यांमध्ये पळणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरेल. बॉलीवूड तारे तारकांबद्दल म्हणाल, तर ते अभिनय करत असल्याचे मला ठाऊक आहे. जाहिरात ते एखाद्या विशेष पदार्थाचा आस्वाद घेताना दाखवतात, किंवा उत्पादने वापरताना दिसतात, त्यावर मी विश्वास ठेऊ शकत नाही. मी जाहिरातींमध्ये नेतेमंडळींना पाहण्यास उत्सुक आहे. खरे पाहता त्यांना कोणतेही काम नसते. संसदेचे अधिवेशन असते तेव्हीही ते काम करत नाहीत. सुस्तावलेला विरोधी पक्षही कॅन्टीनच्या वरणात दाळ शोधावी लागते अशा बिनकामाच्या मुद्द्यावर सदनाचे कामकाज बंद पाडतात.
फक्त निवडणुकीच्या काळात आमचे नेते काम करतात. मिक्सर-ग्राइंडर, लॅपटॉप, टीव्ही वाटपाची आश्वासने देतात. होम अप्लासेन्स तयार करणाºया कंपन्या दर निवडणुकीच्या वेळी या नेते मंडळींशी थेट करार का नाही करत हे कोडे मला आजवर सुटलेले नाही. उदाहरणादाखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका प्रचार सभेत टीव्ही दाखवून सांगितले की, याच ब्रॅण्डचे टीव्ही मतदारांना वाटणार कारण अद्ययावत तंत्रज्ञानाने ते तयार झाले आहेत. या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जाहिरातींवर एक नवा पैसाही खर्च करावा लागणार नाही. प्रचार सभोचे वार्तांकन करण्यासाठी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे तर तेथे असतीलच.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना नजरेसमोर आणा. प्लावूडच्या जाहिरातीत त्यांना घेणे चुकीचे ठरणार नाही. त्यांना फक्त प्लायवूडवर बसावे लागेल. तुटले नाही, तर प्लायवूड दणकट असल्याची खात्री पटेल.
करिना कपूर पर्स खरेदी करताना दाखवण्यात काय अर्थ? तिच्यापेक्षा बसपाच्या नेत्या मायावती अधिक विश्वसनीय आहेत. जाहिरात कंपन्यांनी अभिनेत्यांऐवजी नेत्यांना जाहिरातीत घ्यावे हे आपणच त्यांना सांगितले पाहिजे. यासोबतच दुसरी चांगली बाब म्हणजे जाहिरातींमधून अभिनय करत मॉडेलच्या रुपात या नेतेमंडळींच्या उत्पन्नात वाढ होईल व त्यामुळे देशभरातील आर्थिक घोटाळ्यांची संख्या थोडीतरी कमी होईल.