आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त विजय मिळवूनही धोनी सर्वश्रेष्‍ठ नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सौरव गांगुलीला मागे टाकत महेंद्र सिंह धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे, पण फक्त विजयाची आकडेवारीच त्याला गांगुलीपेक्षा श्रेष्ठ ठरवण्यास पुरेशी आहे का ? धोनीने आतापर्यंत विदेशी खेळपट्टीवर स्वत:ला सिद्ध केलेले नाही.

दोन महिन्यांपूर्वीपर्यंत महेंद्र सिंह धोनी सर्वांनाच नकोसा झाला होता. इंग्लंड - ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर तर अर्ध्याहून अधिक समीक्षक त्याला काढून टाकण्याच्या बाजुने होते, पण गेल्या 15 दिवसांत ऑस्ट्रेलियाला सलग दोन सामन्यांत हरवल्यानंतर धोनीला सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून घोषित करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. तो गांगुलीपेक्षाही उत्कृष्ट असल्याचे म्हटले जात आहे. धोनीने दर दोनपैकी एक कसोटी जिंकली तर गांगुलीच्या यशाचा दर यापेक्षा कमी होता, असा युक्तिवाद केला जात आहे. वास्तविक पाहता विदेशात खेळलेल्या सामन्यांमध्ये धोनीची विशेष छाप दिसलेली नाही. परदेशात खेळलेल्या 19 कसोटी सामन्यांपैकी त्याने जिंकले फक्त पाच, तर गांगुलीने परदेशातील 21 पैकी 11 सामने जिंकले. धोनीच्या नेतृत्वात भारताने गांगुलीपेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले असले तरी धोनीला सर्वोत्कृष्ट म्हटले जाऊ शकत नाही.


पार्श्वभूमी : 2000 मध्ये सचिनने कर्णधारपद सोडले. संघावर मॅच फिक्सिंगचे सावट होते. अशा नकारात्मक परिस्थितीत गांगुलीकडे कर्णधारपद आले. धोनीकडे वारशाने चालून आलेला संघ प्रबळ होता. 2008 मध्ये तो कसोटी कर्णधार झाला तेव्हा संघात ताज्या दमाच्या आणि अनुभवी खेळाडूंमध्ये संतुलन उत्कृष्ट होते.
विदेशातील सामने : गांगुली कर्र्णधार होण्यापूर्र्वी भारतीय संघाला ‘घर का शेर’ म्हटले जात असे, नंतर परिस्थिती बदलली. त्याच्या नेतृत्वात विदेशातही मालिका जिंकून भारताने कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर झेप घेतली. पण धोनी कर्णधार होताच ही परंपरा खुंटली. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारत सलग 8 कसोटी हरला. भारतातील चांगल्या कामगिरीने रँकिंगमध्ये कमावलेले उच्च स्थानही गमावले.


नेतृत्व क्षमता : गांगुलीने संघात विजयाची पात्रता विकसित केली. संघ अंतिम फेरीत पोहोचूनही जिंकत नव्हता. धोनीने वन-डे आणि टी-20 विश्वचषक जिंकवून दिला. या दोन्ही प्रकारांत तो सर्वोत्कृष्ट कर्णधार सिद्ध झाला. असे असले तरी कसोटी सामन्यांत तो अद्याप भारतीय खेळपट्टीवरचाच हीरो आहे. विदेशी खेळपट्टीवर त्याची खरी ‘कसोटी’ अजून बाकी आहे.