Home | Divya Marathi Special | not daughter in law in madhya pradesh village

20 वर्षांपासून गावाला नाही मिळाली ‘सूनबाई’

दिव्य मराठी नेटवर्क - मुरैना (मध्य प्रदेश) | Update - Jun 07, 2011, 02:23 PM IST

मध्य प्रदेशात मुरैना जिल्ह्यातील देवरा गाव नव्या सूनबाईची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण गेल्या 20 वर्षांपासून गावात एकही नववधू आलेली नाही.

  • not daughter in law in madhya pradesh village

    मध्य प्रदेशात मुरैना जिल्ह्यातील देवरा गाव नव्या सूनबाईची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण गेल्या 20 वर्षांपासून गावात एकही नववधू आलेली नाही. देवर्‍यातले 50 वर्षांचे सिकंदर आजही नवरीच्या शोधात आहेत. गावात जवळपास अर्धा डझनहून अधिक लोकांचे लग्न झालेले नाही. गावकर्‍यांच्या मते, गावात वीज, पाणी आणि रस्ते नसल्यामुळे कोणीच बाप आपली मुलगी गावात देणे पसंत करत नाही. 20 वर्षांपूर्वी गावात एक लग्न झाले होते.

    त्यानंतर गावात सनईचे सूर घुमलेच नाहीत. गावातल्या 150 लोकांपैकी लग्न न झालेले बहुतेक 30 ते 45 वर्षांचे आहेत. गावात पाण्याची व्यवस्था आणि येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे नवरोबांना नवरी मिळणे कठीण झाले आहे.

    पूर्वी व्हायचे ‘बहु विवाह’
    आज जे देवरा गाव नवरीच्या प्रतीक्षेत आहे त्याच गावात 30 वर्षांपूर्वी लोक एकापेक्षा जास्त लग्नं करत होते. 102 वर्षांचे राधाकृष्ण यांनी सांगितले की, त्यांचा दिवंगत मुलगा बाली बाबाचे चार विवाह झाले होते; पण गावातल्या सोयी-सुविधा बंद झाल्यामुळे गावात हल्ली लग्नंच होत नाहीत.

Trending