आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट ऐकण्‍याच्या आनंदात वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डॉल्बी अ‍ॅटमॉस म्हणजे भविष्यातील थिएटर सराउंड साउंड असे म्हटले जात आहे. या सिस्टिममुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांना अद्भुत अनुभव येईल. सध्या थिएटरमध्ये स्क्रीनच्या मागे स्पीकर लावले जातात. उजव्या व डाव्या चॅनलमधून आवाज डावीकडे, उजवीकडे आणि मागील भिंतीपर्यंत पाठवला जातो. चांगल्या इफेक्टसाठी सबवूफर्स मध्यभागी लावले जातात. डॉल्बी अ‍ॅटमॉसमध्येही रचना अशीच राहील. मात्र, काही साउंड स्लॅब्स छतालाही लावले जातील.

वेगळा अनुभव - डॉल्बी अ‍ॅटमॉसमध्ये स्पीकर छताला लावले जातात. या रचनेमुळे बारीक-सारीक आवाज स्पष्ट ऐकू येतात. या सिस्टिमद्वारे एका पॉइंटपासून दुस-या पॉइंटपर्यंत आवाज सहजपणे पोहोचवणे साउंड इंजिनिअरला शक्य होते.
आनंद द्विगुणित - डॉल्बी अ‍ॅटमॉस सराउंड सिस्टिम बसवणारे चेन्नई येथील सत्यम हे पहिले थिएटर आहे. या सिस्टिममुळे थ्रीडी चित्रपटांचा आनंद द्विगुणित होईल. मल्टिप्लेक्सलाही त्याचा जास्त फायदा होईल. जगभरात सुमारे 70 थिएटर्समध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस सिस्टिम बसवण्यात आली आहे. द हॅबिटाट, द लाइफ ऑफ पाय, अ‍ॅन अनएक्सपेक्टेड जर्नी, असे चित्रपट डॉल्बी अ‍ॅटमॉस फॉरमॅटवर बनवले आहेत. आता याच फॉरमॅटमध्ये चित्रपटांची निर्मिती केली जाईल.
घरासाठी नाही : ही सिस्टिम घरात वापरण्यासाठी नाही. लवकरच तशी सिस्टिमही बनवली जाईल. यामध्ये अनेक स्केल उपलब्ध असून थिएटरमालक बजेटनुसार या सिस्टिमचे नवे मॉडेल्स अपग्रेड करू शकतील.