आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारमध्‍ये होईल मसाजची ही सोय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जुन्या मॉडेलपेक्षा रेंज रोव्हरच्या नव्या मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत. यातील 18-वे पॉवर्ड सीटवर बसल्यास मसाज मिळेल आणि प्रवास सुखकर होईल. कारचे हे वैशिष्ट्यही आहे. डॅशबोर्डचे डिझाइन साधेच ठेवले आहे. त्यामुळे डॅशबोर्ड ऑ परेट करणे अतिशय सोपे झाले आहे. टचस्क्रीनचा रिस्पॉन्स टाइम चांगला आहे. त्याची तुलना आयफोनशी होऊ शकते. केबिनवर विशेष मेहनत घेतलेली आहे. कारमध्ये मेटल कॉर्नर कार्पेट मॅट आहेत. मेरिडिअन साउंड सिस्टिमही असल्यामुळे संगीताचा खराखुरा आनंद मिळेल. हिचे इलेक्ट्रिक स्टिअरिंग वजनाला हलके आहे. विंडो लाइन खाली असल्याने सीटवरून बोनेट पाहता येते.

रेंज रोव्हर ‘4.4 लिटर टीडीव्ही8 डिझेल’ आणि ‘5.0 लिटर सुपरचार्जड् पेट्रोल’ या दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे. डिझेलइंजिन ‘बेस’ व्होग एसई व ऑ टोबायोग्राफी आणि पेट्रोल इंजिन फक्त ऑटोबायोग्राफीमध्ये आहे. व्होग एसई मॉडेलमध्ये पॅनोरामिक सनरूफ, झिनॉन लाइट, सराउंड कॅमेरा,
फोर-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टिम, इंटेरिअर मूड लायटिंग, मेरिडियन सराउंड सिस्टिम, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, 18-वे पॉवर्ड सीट विथ मसाज फंक्शन ऑफ-रोड अ‍ॅबिलिटी अशी वैशिष्ट्ये आहेत.