आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसमध्ये नवीन लूक देणारे सात पोशाख!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिससाठी नवीन लूक अंगीकारणे आव्हानात्मक असते. डिझायनर राजदीप रनावत यांनी कॉर्पोरेट लूक बदलण्यासाठी ड्रेसिंगच्या सात स्टाइल्सबाबत सांगितले आहे. फिल्म कॉर्पोरेटमधील बिपाशा बसूच्या लुक्सने लक्ष आकर्षित केले होते, असे त्यांचे म्हणणे आहे

1. राजदीपच्या मते कॉर्पोरेट जगतात ग्लॅमर आणि आत्मविश्वासासोबत शरीरसौष्ठवही आवश्यक असते. त्यासाठी कार्यालयीन वेशभूषेत अनेक प्रकारचे रंग आणि कट्सचा वापर करावा. कट्स स्टायलिश ठेवल्यामुळे बदल घडून येईल.
2. कॉर्पोरेट लूकसाठी वेस्टर्न आऊटफिटच घालण्याची आवश्यकता नाही. गुलाबी जॉर्जेट कुर्ता किंवा लाँग ब्लॉक शर्ट खुलून दिसेल. जॅकेट आणि स्कर्टमध्ये फ्लोरल एम्ब्रॉयडरीमुळे स्मार्ट लूक मिळेल.
3. जॅकेटवर थोडा एसिमिट्री स्टाइलचा वापर करावा. त्यात शक्य तितका साधेपणा ठेवावा. त्यामुळे उत्कृष्ट लूक मिळेल. तो ओंब्रे ड्रेप्स ड्रेससोबत घातल्यास तुम्हाला स्वत:मध्ये वेगळेपणाची जाणीव होईल. हा ड्रेस घालून तुम्ही पक्षकारासोबत भोजन बैठक किंवा सायंकाळ घालवू शकता.
4. चॅक जॅकेटसोबत बटन शर्टचे संयोजनही छान दिसेल. स्कर्टसोबत अथवा पँटसोबतही घातल्यास व्हाइट शर्ट प्रत्येक ऋतूमध्ये खुलून दिसतो. कपड्यांच्या या शैलीबरोबरच केसांच्या शैलीतही बदल करा. पोनिटेल केल्यास नीटनेटका आणि प्रोफेशनल लूक येईल.
5. ग्लॅमरस दिसणे आवश्यक आहे, अशा ग्लॅमर इंडस्ट्रीत तुम्ही काम करीत असाल तर इंकार या चित्रपटातील चित्रांगदा सिंगप्रमाणे गुडघ्याच्या वरपर्यंत ब्लॅक ड्रेस अगदी चपखल संयोजन होईल.
6. अ‍ॅसेसरीजच निवड विचारपूर्वक करा, कारण अ‍ॅसेसरीज लूक देतात आणि बिघडवूसुद्धा शकतात. लूकमध्ये नावीन्य येईल, असे निवडक पीस घाला. मिड लेंथ नेकलेस, फंकी रिंगमुळे वेगळा लूक मिळेल.
7. नी-लेंथ फिटेड स्कर्टसोबत टँजरीन किंवा कोबाल्ट ब्ल्यूसारखे चमकदार रंग छान दिसतील. ही स्टाइल अंगीकारल्यास निश्चितच तुम्ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठराल.

अस्मिता अग्रवाल
20 वर्षांपासून फॅशनविषयक लेखनातील चर्चित नाव