आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संशोधन - मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते कामाची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका नव्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. आई-वडिलांच्या कामावर जाण्याच्या वेळेचा मुलांवर परिणाम होतो. अमेरिकन सोशियोलॉजी असोसिएशनच्या समाजशास्त्र आणि लोकसंख्या प्राध्यापक मॉली मार्टिनने सांगितले की जी मुले आपल्या आई-वडिलांसोबत बसून नाष्टा किवा रात्रीचे जेवण करतात, ते जास्त आरोग्यदायी राहतात, तर जे आई-वडील नाष्टा करता ऑफिसला जातात त्यांची मुले देखील जेवणाविषयी फारसा उत्साह दाखवत नाहीत. परिणामी त्यांचे आरोग्य बिघडू लागते. मार्टिन म्हणतात की, अनेक आई-वडील नाष्ट्याला जास्त महत्त्व देत नाहीत. ऑफिसला जाण्याच्या गडबडीत ते विसरून जातात की मुलांनी नाष्टा करणे गरजेचे आहे. यामुळे दिवसभर मुलांची चयापचय प्रक्रिया योग्य राहते.