आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही नवे, काही जुन्या फॅशनचे ट्रेंड राहतील नवीन वर्षात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष २०१६मध्ये फॅशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य राहिले अाहे परंपरागत व पाश्चिमात्य ट्रेंड‌्सचा एकत्र उपयोग. बॉडी फिट ड्रेसपेक्षा लोकप्रिय सिलहूट्स राहिले आणि ट्यूनिक्सचा जास्त वापर झाला. २०१७मध्येही फॅशनवर पाश्चिमात्य प्रभाव कायम राहील आणि अॅसिमेट्रिकल लेअरिंग, बोल्ड शोल्डर्स असलेले ड्रेस वर्षभर पाहायला मिळतील. याशिवाय १९८० आणि ९० च्या दशकात लोकप्रिय राहिलेला फॅशन ट्रेण्ड पुन्हा वापरात येईल.

- बोल्ड शोल्डर्स : ऑफ शोल्डर ब्लाऊज, कोल्ड शोल्डर ड्रेस आणि शिअर स्लीव्ह टॉप, थाेडीशी स्किन दिसणारा ट्रेंडही या वर्षात कायम राहील. हे फर्टी, फन, फेमिनाइन ट्रेंड प्रत्येक शेप व मापाच्या महिलांसाठी आहे. 

- एग्जागरेटेड स्लीव्हज : स्टाइल स्टेटमेंट बनवण्यासाठी एग्जाजरेटेड ट्रेंड‌्स सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहतील. लांब फ्लोअर-लेंथ स्लीव्हपासून लहंगा ब्लाऊजपर्यंत, जीन्सवर रफल्ड स्लीव्ह टॉप मेहनतीशिवाय चांगला लूक देऊ शकतो. 

- अॅसिमेट्रिकल लेअरिंग : लेअरिंग केवळ थंडीतच नसते. ब्रीदेबल, नॅचरल फॅब्रिक्स उन्हापासून वाचण्यासाठी उत्तम पर्याय. ट्यूनिक आणि पलाजोवर लांब अॅसिमेट्रिकल जॅकेट, अंॅटिफिट सेपरेट्स वर्षभर ट्रेंडमध्ये राहतील. 

- मेटॅलिक एक्सेंट : फॉक्स मेटल एम्बेलिशमेंट्स कोणत्याही ड्रेसला फ्यूचरीस्टिक टच देतात. हा ट्रेंड सुटीव्यतिरिक्त डिनर पार्टीमध्येही वापरता येऊ शकतो. मेटॅलिक टेक्स्चरमध्ये एवंट गार्ड सिलहूट्स डिझाइन असतील. एक्सपिरिमेंटल नसतील तर मेटल स्टड्स, बॅग्ज आणि शूजवर मेटॅलिक एक्सेंट लावून सुरुवात करता येऊ शकते. 

- फ्रिंज आणि टॅसल : हॅण्डबॅग, ड्रेस, हेम अथवा दुपट्ट्याच्या शेवटी फ्रिंज, टॅसल अबर चिक लूक देतील.

स्टेटमेंट चोकर्स : हा ९०च्या दशकाचा ट्रेंड आहे. तो आता परत येत आहे. यात एफर्टलेस अपील आहे. ऑफशोल्डर ड्रेसला फिनिशिंग टच देण्यास प्लेन व्हेल्वेट व मेटल एम्बेलिश्डही हॉट राहील.

सिक्विंस अॅण्ड स्पार्कल : उत्सवकाळात यात वेगळे काही नसते. ८०च्या दशकात रेट्रो वाइब्स दुसऱ्यांदा ट्रेंड करेल.  मोठे आणि बोल्ड सिक्विंस कोणत्याही उत्सवात लक्ष खेचेल.  

शियर : फेमिनाइन आणि फ्लर्टी स्टाइल पसंत असेल तर तो शिअर या वर्षात चलनात राहील. पार्टी ड्रेस, इव्हिनिंग गाऊन रेडी-टू-वेअर टॉप व स्वेटरमध्ये हा ट्रेंड सहभागी करू शकता.नेट आणि ऑरेगेंजा उत्तम आहे. 
- अिस्मता अग्रवाल, फॅशन रायटर, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...