आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1100 वर्षांपूर्वीची आहे ही गणेश मूर्ती, तुम्‍ही पाहिले नसतील हे 15 प्राचिन शिल्‍प व चित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देशात गणपती बाप्‍पांची अत्‍यंत प्राचिन अशी शिल्‍प आणि चित्र आहेत. प्रत्‍येक शिल्‍प, चित्राचा कालखंड वेगळा आहे. त्‍यानुसारच रचनेतही विविधता आढळते. पण अत्‍यंत जुन्‍या गणेशमूर्ती आजही तेवढ्याच आकर्षक वाटतात. गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात अशाच काही अत्‍यंत दुर्मिळ मूर्ती आणि चित्रे दाखवणार आहोत.
छत्तीसगढमधील प्राचिन मूर्ती..
वरील मूर्ती ही छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यातील ढोलका पहाडावर आहे. ही मूर्ती अत्‍यंत भव्य आणि प्राचिन शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सहा फूट उंचीची ही मूर्ती दगडात कोरली गेली असून ती 3 हजार फूट उंचीवरच्या पहाडावर बसविली गेली आहे. ही मूर्ती सुमारे 1000 वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज तज्‍ज्ञ व्‍यक्‍त करतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, देशातील अत्‍यंत प्राचिन शिल्‍पे आणि चित्रे..
बातम्या आणखी आहेत...