आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या पिढीला चित्रांमधून,तोंडीच सांगायला उरले हे लहानपणीचे खेळ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षापूर्वी शाळेला सुट्टी लागली की, मुले मामाच्या गावाला जायला निघायची. पण झपाट्याने वाढणा-या युगामध्ये ही लहान मुले टि.व्ही. मोबाईल गेममुळे मामाचे गाव विसरली असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.
पहिले उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विट्टीदांडू, लिंगोरच्या, गोटया, चिंचोके, सुरप्यारंब्या, शिवणापाणी, लपाछपी, कोपरापाणी,पत्ते,सापशीडी,व्यापार हे खेळ मोठ्या उत्साहात खेळले जायचे. परंतु आजच्या पिढीला हे खेळ आता नावापुरते उरले असुन ते इतिहास जमा झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
आज प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन आसल्यामुळे आजचा तरुण जुने खेळ विसरुन ऑनलाइन गेम्स खेळत असल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. शरिराला व्यायाम करायला लावणारे खेळ न खेळता आज सर्व मुले आपल्याला कॅन्डी क्रश, टेंपल रन, तीन पत्ती, सब वे सरफेस हे खेळ खेळताना दिसत आहे.
आज पारंपारीक खेळ जवळ जवळ बंद पडल्यात जमा आहेत. त्यामुळे हे खेळ आता गोष्टीत किंवा लिहिण्यापुरते उरले असुन काळाच्या ओघात ‘‘मामाचे गाव’’ ही हरवले आहे. नात्यामध्ये व्यवहारीक पणा आल्याने आजच्या पिढीला नात्याचे महत्व उरलेले नाही. आज बरेच कुटूंब मुलांना सुटी लागली की, फिरण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणांवर अथवा हॉटेल्समध्ये घेवून जातानाचे चित्र बघायला मिळत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, जुन्या खेळांची छायाचित्रे....