आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयोवृद्ध पांडा : आजारातही हसतमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - जगातील सर्वात वयोवृद्ध मादी पांडा जिया राहत असलेल्या उद्यानाला भेट दिली तेव्हा तिच्याविषयी अनेक रंजक बाबी समजल्या. पांडाचे सरासरी वय २० वर्षे असते. मात्र, जिया ३७ वर्षांची आहे. पांडाच्या आयुष्यात हे ११० वर्षे वयोमान आहे. तिला रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास आहे तरीही ती हसतमुख आहे.

जियाचे नाव गिनीज विक्रमात सर्वात वयोवृद्ध पांडाच्या रूपात नोंद झाले आहे. जिया सध्या हाँगकाँगच्या ओशियन पार्कमध्ये राहते. उद्यानाचे वरिष्ठ देखरेख अधिकारी हावर्ड चूक म्हणाले, पांडावर २४ तास निगराणी ठेवली जाते. तिच्या आरोग्याची रोज तपासणी होते. तिने नैसर्गिक पद्धतीने राहावे असे आम्हाला वाटते. तिच्या आरोग्यापासून आहाराची विशेष काळजी घेतली जाते.

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर पांडाला वैद्यकीय तपासणीसाठी तयार केले. सुरुवातीस बीपी तपासताना अडचणी येत होत्या. मात्र, आता जियाच नव्हे, तर अन्य पांडाही बीपी, रक्त नमुने, एक्स-रे आणि अल्ट्रा साउंड स्कॅनिंगसारख्या तपासण्यांना सामोरे जात आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे सोयीस्कर जाते. प्राणी प्रशिक्षक मॅगी म्हणाले, जियाला संतुलित आहार दिला जातो. नाष्ट्यात ताजी फळे, भाज्या व बिस्किटांचा समावेश असतो. जियाला नाशपती सर्वात जास्त आवडते. ७८ किलो वजनाची जिया रोज ६ किलो बांबूची पाने, फळे आणि भाज्यांचे सेवन करते. जियाला सोया दुधासोबत औषध दिले जाते. ती दररोज १२ ते १६ तास झोपते. जियाने आतापर्यंत पाच वेळेस ६ पांडांना जन्म दिला. चीन सरकारने १९९९ मध्ये जियाला हाँगकाँगला भेट म्हणून दिले.