आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Day Picnic Spot At Aurangabad, Divya Marathi Tourism Article

OnE DAy PicNic @ A\'BAD: पर्यटनासह घ्या तिर्थाटनाचाही आनंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगाबाद म्हटले तर, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळच्या लेण्या, बीबी-का मकबरा, दौलताबादचा अभेद्य किल्ला, सोनेरी महल या ऐतिहासिक स्थळांसोबत गौताळा अभयारण्य, म्हैसमाळ हे निसर्गरम्य स्थळे डोळ्यासमोर येतात.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लागला आहे. या शहराने सुमारे दोन हजार वर्षांहून जुनी परंपरा जपली आहे. त्यामुळे इतिहासातील प्रत्येक कालखंडाच्या पाऊलखुणा शहरासह आसपासच्या परिसरात आढळतात. याचबरोबर या जिल्ह्याला निसर्गानेही भरभरून दिले आहे. औरंगाबादमध्ये प्रेक्षणीय स्थळांची पर्वणीच आहे. जवळपास 20 ते 25 किलोमीटरला अंतरावर एक तरी पर्यटन स्थळ आहे.

चारही बाजूंना डोंगर आणि डोंगररांगांच्या कुशीस वसलेल्या या शहरात अनेक 'वनडे प‍िकनिक स्पॉट्स'आहेत. मुघलकालीन बीबी-का- मकबरा, निजामकालीन पानचक्की, बौद्घ लेण्या आहेत. येथील शिल्पकला पाहाण्यासाठी देश‍-विदेशातील लाखों पर्यटक येथे येतात. आता सलीम अली सरोवर, सिद्घार्थ उद्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तु संग्रहालय यांचा समावेश करावा लागेल. याशिवाय जिल्ह्यात जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक तर काही धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा तर आनंद मिळतो सोबत तिर्थाटनही करता येते.
OnE DAy PicNic @ A'BAD च्या माध्यमातून आपल्यासाठी औरंगाबाद शहरासह ‍जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेवून आलो आहोत.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, खाम नदीच्या तीरावर वसलेल्या 'खडकी'गावाला लाभले 'औरंगाबाद हे नाव!