आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीच्या पेपरवर्कचे टेन्शन एकाच फोलियोमुळे होणार दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात माझी भेट एका गुंतवणूकदाराशी झाली. त्याने 40 म्युच्युअल फंड घेतले होते. प्रत्येक वर्षी त्याने वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक केली. गुंतवणूक करताना प्रत्येक वेळी त्याने नवीन फोलियो घेतला. कारण प्रत्येक वेळी एनएफओसाठी (न्यू फंड ऑफर्स)त्याने अर्ज केला होता.
म्युच्युअल फंड अनेक नावांनी असतात. ते वेगवेगळ्या योजनेंतर्गत विकले जातात; परंतु गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना फंड खरंच वेगळा आहे का? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. त्यानंतर या फंडस आपल्या पोर्टफोलियोशी जोडले तर अधिक फायदेशीर राहील. फंड कोणताही असो, परंतु लार्ज आणि मिडकॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे एकाच श्रेणीत पैसे लावणे आहे. एकाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टॅक्स सेव्हिंग फंड घेणे म्हणजे पेपरवर्क वाढविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे फंडचा खरा फायदा आपल्याला मिळणार नाही. कोणत्याही गुंतवणूकदारास गुंतवणूक करताना एक फोलियो क्रमांक दिला जातो. त्यामुळे त्याने आपली सर्व गुंतवणूक एकाच फंड हाऊसमध्ये त्या फोलियोत करावी. गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराचा पॅन क्रमांक घेतला जातो आणि त्याच क्रमांकाच्या आधारे फंड हाऊसमध्ये सर्व गुंतवणूक एकत्र ठेवली जाते. यामुळे वेगवेगळे फोलियो करण्याचे कोणतेही औचित्य राहत नाही.
बॅँक अकाउंट नंबर, ई-मेल, मोबाइल क्रमांक फोलियो उघडताना द्यावा लागतो. हे सर्व त्याच फोलियोत गुंतवणूक केली तर राहतात. पुन्हा ही माहिती देण्याची गरज पडत नाही. गुंतवणूकदारास आपले पैसे एका फंडमधून दुस-या फंडमध्ये घेऊन जाता येते. एकाच फोलियोचा वापर केल्यास त्यातच अजून गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराकडे एकाच फोलियोंतर्गत
शॉट टर्म डेबिट फंड असेल आणि लॉग टर्म इक्विटी फंड असेल तर पैसे एका फंडातून दुस-या फंडात नेता येतात. त्यासाठी जास्त पेपरवर्क
करावा लागत नाही. जर गुंतवणूकदारास फोलियोत बॅँकेचे नवीन खाते क्रमांक द्यायचे असेल तर एकच
फोलियो असल्यास ते सहज होऊन जाते. नॉमिनेशन, पॉवर ऑफ अटॉर्नी या बाबीची पूर्तताही सोपी होते. यामुळे एकाच फोलियोत गुंतवणूक करणे अधिक सोयिस्कर आणि फायदेशीर असते.