आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनमध्ये ऑनलाइन खरेदीमुळे उद्योगांना नवसंजीवनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
्रिटन हा दुकानदारांचा देश आहे, असे नेपोलियनने एकदा मस्करीत म्हटले होते. मात्र, आता हा देश ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांचा देश आहे. ब्रिटनमध्ये जगात सर्वाधिक ऑनलाइन खरेदी केली जाते. ताज्या अाकडेवारीनुसार, २०२० पर्यंत ऑनलाइन विक्रीत ५० टक्के वाढ होईल व तिची उलाढाल पाच हजार अब्ज रुपयांपर्यंत जाईल.
ब्रिटनमधील ई-कॉमर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटनची भौगोलिक परिस्थिती. मध्य इंग्लंडमधील अॅमेझॉन येथील पीटरबोटो स्थित गोदामातून २४ तासांत कुठेही माल पोहोचवला जाऊ शकतो. येथील आयएमआरजी या ऑनलाइन रिटेलर्स संघटनेच्या मते, जानेवारी ते सप्टेंबर २०१६ दरम्यान स्मार्टफोनवरून ऑनलाइन खरेदीची विक्री ९० टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये पार्सल डिलिव्हरीत १३ टक्के वाढ झाली आहे. येथील रॉयल मेल या सरकारी टपाल सेवेचे बुडते जहाज या पार्सल्समुळेच पुन्हा किनाऱ्याला लागले आहे.

ई-कॉमर्समुळे गोदामांची संख्या वाढली. देशात चार कोटी चौरस मीटर क्षेत्रात वेअरहाऊस आहेत. ई-रिटेलर्सच्या गर्दीत कंपन्यांमध्ये कमीत कमी वेळेत माल पोहोचवण्याची स्पर्धा सुरू आहे. लंडन आणि परिसरातील भागात तासाभराच्या आत डिलिव्हरी करण्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे. डिलिव्हरीचा वेग वाढवण्यासाठी मोठ्या शहरांबाहेर वेअरहाऊससाठी जागेची मागणीही वाढली आहे. लंडनमध्ये गेल्या सहा वर्षांत वेअरहाऊसचे भाडे १७ टक्क्यांनी वाढले आहे. ब्रिटनमधील बहुतांश सुपरमार्केट घरपोच सेवा देतात. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे. रोड हॉलेज संस्थेच्या मते, घरपोच सेवेची मागणी वाढल्यामुळे आणखी ४५ हजार चालकांचा तुटवडा भासत आहे. घरी बसून खरेदी वाढल्यामुळे पारंपरिक दुकाने बंद होत आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. ब्रिटन रिटेल कन्सोर्टियमनुसार, रिटेल उद्योगांमध्ये २०२५ पर्यंत एकतृतीयांश नोकऱ्या कमी होतील. मात्र, काही ऑनलाइन रिटेलर्स आपली दुकाने वाढवतच आहेत.
बातम्या आणखी आहेत...