आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेटवर ऑनलाइन बुद्धिभेद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटच्या स्वरूपात बदल झाला आहे. एक काळ असा होता, माहितीचे भंडार म्हणून लोक त्याला आदर्श मानायचे. आता संकेतस्थळे वेगळीच भासतात. अपलोडिंगचा वेग आपल्याला वाढवायचा असेल तर तांत्रिक माहितीसह तो आपली मदत करेल. मात्र तुम्ही चिंता, काळजीने ग्रस्त असाल तर तो स्वत:ला संपवण्यासाठी तुम्हाला प्रेरित करेल.

मनोवैज्ञानिक यास ऑनलाइन सामाजिक भेदभाव मानतात. याचा परिणाम असा की, गूढ, अदृश्य, जबाबदारीचा अभाव आणि समोरसमोर संवादापासून पळण्याची वृत्ती वाढीस लागते. आपल्या जीवनातील प्रत्येक घटक स्मार्टफोनच्या रुपात याने व्यापला आहे.
हे ऑनलाइन स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या लोकांना ट्रॉल्स असे म्हणतात. ऑनलाइन चोर, ठकांद्वारे फसवणाऱ्या पद्धतीतून ट्रॉल्स हा शब्द तयार झाला आहे. अंधारात लपून लोकांना धमकी देणाऱ्या राक्षसांसाठी हे आयतेच कुरण होते. इंटरनेट ट्रॉल्सचे म्हणणे असे की हे सर्व ते मजा म्हणून करतात. ट्रॉल्स जे म्हणत आहेत त्याचा विस्तारित अर्थ मस्करी, त्रास ते हिंस्र धमक्या असा आहे. सोशल सिक्युरिटी नंबर, बँकेचे खाते क्रमांकही ते जगजाहीर करू शकतात.

त्यांचा हा खेळ झपाट्याने पसरत आहे. २०११ मध्ये ट्रॉल्सनी फेसबुकच्या मेमोरियल पेजवर मृत युजर्सची खिल्ली उडवली होती. २०१२ मध्ये महिला कार्यकर्त्या अनिता सारकीसियन यांनी व्हिडिओ गेम्समध्ये महिलांचे घृणास्पद दर्शन घडवणाऱ्याविरुद्ध पैसे जमवण्याचे अभियान सुरू करताच त्यांना बॉम्बने उडवण्याची, अत्याचाराची धमकी नेटवर तसेच प्रत्यक्षपणे देण्यात आली.

ट्रॉलिंगच्या माध्यमातून राजकीय लढाईलाही पेव फुटते. अमेरिकेत इंटरनेटवर एल्ट-राइट हे पुरुषांच्या अधिकारासाठी काम करणारे आंदोलन चालते. ते विदेशींना प्रवेश देण्याच्या विरुद्ध आहेत. शक्यता अशी आहे की, संगणकाच्या मदतीने अमेरिकेच्या राष्ट्रपतीपद निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ़डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र तयार करण्यात आले असावे. ट्रम्पही या गटाशी आपल्या विचारांचे आदानप्रदान करतात. त्यांनी स्वत: सुरुवातीच्या काळात रिपब्लिकन स्पर्धक सिनेटर लिंडसे ग्राहम यांना ट्रॉल केले होते.

एल्ट राइट ट्रॉलिंगला राजकीय अॅक्टिव्हीजमची एक पद्धत मानतात. ट्रॉलिंगचे नवे सांस्कृतिक युद्ध केवळ समलैंगिकता, गर्भपात, रॅपची गाणी आणि उत्तेजक औषधांपर्यंतच मर्यादित नाही. हे प्रत्येक ठिकाणी - व्हिडियो गेम, कपड्यांच्या जाहिराती आणि विनोदापर्यंत पसरले आहे. २०१६ मध्ये आय घास्टबस्टर्सच्या सिक्वेल चित्रपटात पुरुषांऐवजी चार महिलांना प्रमुख भूमिका देण्यावरुनही ट्रॉल्स संतापले होते.

त्यांनी ट्वीटरवर चित्रपटातील कलाकार लेसली जोन्सवर वर्णभेदाची अतिशय घाणेरडी टिप्पणी केली होती. त्यामुळे या संकेतस्थळावरूनच बाहेर पडण्याचा विचार ती करत होती. जोन्सच्या छळानंतर एल्ट-राइटचा नेता मिलो यिआनोपॉलसला ट्वीटरवर स्थायी रुपात बंदी घालण्यात आली आहे. मिलो कंजरव्हेटिव्ह वेबसाइट ब्रीटबार्ट न्यूजचे संपादक आहेत. संकेतस्थळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेननवर १७ ऑगस्टला ट्रम्प यांचे निवडणूक अभियान चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नेटवर सामाजिकदृष्ट्या अस्विकाहार्य विचार वाढत चालले आहेत. संकेतस्थळांवर गौरवर्णीयांच्या श्रेष्ठतेचे समर्थन करणारी अनेक संकेतस्थळे आहेत. अशा संकेतस्थळांवर सापडणारे लोक ८ चान वा ४ चान सारख्या संकेतस्थळांवर दिसू लागले आहेत. तिथे स्विकारले जाताच ते अमेरिकेत लोकप्रियतेच्या बाबतीत ९ व्या क्रमांकावर असणारे संकेतस्थळ रेडिटवर प्रवेश करतात. रेडिट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे संकेतस्थळ आहे. मात्र त्याने गेल्या वर्षी पाच गटांवर बंदी घातली. यात दीड लाख जणांचा फॅटपीपलहेट गट समाविष्ट आहे. हा गट लठ्ठ लोक खासकरून महिलांवर नेहमी टिप्पणी करत असतो.

ट्वीटरचे डेल हार्वे मानतात की, नेटवर टीकेसह त्याचा दुरुपयोग रोखणे अतिशय कठीण काम आहे. हार्वे हे त्यांचे खरे नाव नाही. खूप वर्षांपूर्वी प्रोफेशनल ट्रॉल बनल्यावर डेल यांनी हे नाव स्वीकारले. ट्रॉलिंगच्या वाढत्या प्रभावात लोकांना वाटते की याविरुद्ध लढण्यासाठी कायदा आणि पोलिस प्रशिक्षणही पुरेसे नाही.वरिष्ठ पोलिस अधिकारी माइक बायर्स म्हणतात की, सोशल मीडिया कारवाई करण्याला कचरते. एखाद्याच्या जीवाला धोका असल्यास ट्वीटर आणि स्नॅपचॅट सारखी संकेतस्थळे त्वरित पावले उचलतात. मात्र ऑनलाइन छळाच्या प्रकरणात सोशल मीडिया कंपन्यांकडून कारवाईची अपेक्षा करणे वेळ दवडण्यासारखेच आहे.सोशल मीडियावर ट्रॉलिंगपासून वाचण्याच्या रणनितीनुसार छळ झालेल्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवली जाते. रिओ ऑलिम्पिकदरम्यान महिला जिम्नॅस्ट स्टार गॅबी डगलस आणि मॅक्सिकन जिमनास्ट एलेक्सा मोरेनोवर वर्णद्वेषी हल्ले करण्यात आले. त्यावेळी अनेक युजर्सनी त्यांना चांगले संदेश पाठवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

ट्रॉल्सवर नियंत्रण कसे आणणार? ऑनलाइन कम्युनिटीचे रेकॉर्ड मिळतेजुळतेच आहे. या संकेतस्थळांवर ट्रॉल्स सर्वाधिक सक्रिय आहेत.
- 8 चान: ट्रॉल्सवर बंदी घातलीच तर त्यांच्या हे मुक्कामाचे ठिकाण. ते संकेतस्थळावर चाइल्ड पोर्नोग्राफीवरही मोकळेपणाने चर्चा करतात.
- 4 चान: इमेज पोस्ट करता येणारे हे संकेतस्थळ ट्रॉल्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे. सामान्यही या संकेतस्थळांवर असतात.
- वोट: रेडिटने संदेश हटवणे सुरू केल्यावर संकेतस्थळावर युजर्सनी गर्दी कमी केली. वोट २०१४ मध्ये सुरू झाले होते.
- रेडिट: घृणा पसरवणारे गट येथे सक्रिय आहेत. ते सहजपणे दुसऱ्या युजर्सच्या मॅसेज बॉक्समध्ये प्रवेश करून दुसरीकडे उडी मारू शकतात.
- यिकयाक: हे संकेतस्थळ मर्यादित क्षेत्रात अज्ञात युजर्सना पोस्ट करण्याची सुविधा देते. विद्यार्थी, शिक्षकांना धमकावण्याचे हे साधन.
- ट्विटर: ज्या लोकांना आपण ओळखतही नाही त्यांच्या खात्यावर टॅग करण्याचा हा सुलभ मार्ग. यामुळे अनेक अश्लिल कॉमेंटही होतात.
- यू ट्यूब: जे संकेतस्थळ सर्वाधिक पाहिले जाते त्यावर आपल्या घाणेरड्या मतांना लोकप्रियता मिळावी असा काही जणांचा नेहमीच प्रयत्न असतो.
- फेसबुक: लपण्याचे मार्ग अतिशय कमी असल्यामुळे तसेच सुरक्षेमुळे हे संकेतस्थळ ट्रॉलिंगसाठी अनुकूल नाही.
- इंस्टाग्राम: काही हाय प्रोफाईल लोकांची शिकार होऊनही हे संकेतस्थळ सुरक्षित आहे. जस्टिन बीबरने ऑगस्टमध्ये निगेटिव्ह कॉमेंटच्या त्रासाला कंटाळून येथून काढता पाय घेणे पसंत केले.
- स्नॅपचॅट: किशोरवयीनांमध्ये लोकप्रिय. मेसेजिंग सर्व्हिसवरून फोटो इतक्या लवकर गायब होतात की, ते नीट पाहायलाही वेळ मिळत नाही.

७० टक्के तरुणांचा छळ
दोन वर्षांपूर्वी प्यू रिसर्च सेंटरचे सर्वेक्षण प्रसिद्ध झाले. इंटरनेट वापरणाऱ्या १८ ते २४ वर्षे वयाच्या ७० टक्के तरुणांना छळाला सामोरे जावे लागल्याचे हे सर्वेक्षण सांगते. या वयाच्या २६ टक्के तरुणींचे म्हणणे असे की, त्यांचा ऑनलाइन पाठलाग करण्यात आला. मनोविज्ञान पत्रिका - पर्सनॉलिटी अँड इनडिव्हीज्युअल डिफरन्सेस- मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार स्वत:ला ट्रॉल्स म्हणवणारे ५ टक्के यूजर्स आत्ममग्न, मनोविकृत, मानसिक रोगाने पछाडलेले असतात.

महिला, अल्पसंख्याकांची अडचण
संकेतस्थळावर ट्रॉल्सची संख्या वाढताच महिला, जातीय आणि धार्मिक अल्पसंख्याखांचा आवाज दबला जातो. या समुहाच्या तरुणांना वाटते की ट्रॉलिंग ऑनलाइन जीवनाचा एक भागच आहे. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. टाइम मासिकाच्या लेखकांना एका सर्वेक्षणात आढळले की, ८० टक्के लोकांनी एका चर्चेच केवळ भितीपोटी भाग घेतला नाही. इतक्याच लोकांचे म्हणणे असे होते की, ऑनलाइन छळ त्यांच्या कामाचाच एक नियमित भाग आहे.
बातम्या आणखी आहेत...