आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांकरिता घातक बनू पाहतेय ऑनलाइन जग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील क्लीवलँड, ओहियोमध्ये 14 वर्षीय मॅथ्यू होमिकने 10 जानेवारी 2014 ला आत्महत्या केली. मृत्युपूर्वी काही दिवस अगोदरपासून त्याच्यावर मानसिक विकाराबाबत उपचार सुरू होते. त्याचे वडील होमिक रे होमिक म्हणतात, मॅथ्यू गोंधळलेला असायचा, पण ऑक्टोबर 2013 पासून पूर्वीच्या तुलनेत तो अधिक एकाकी राहू लागला होता. त्याने मला सांगितले की, लोक इंटरनेटवर त्याच्याबाबत चर्चा करतात. तो त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तो आपल्या नव्या आयफोनद्वारे Ask.fm या संकेतस्थळावर ऑनलाइन असायचा.

41 वर्षीय रे यांनी संकेतस्थळाबाबत ऐकलेले नव्हते. पण, अनेक अमेरिकन किशोरवयीन मुलांना त्याबाबत माहिती आहे. जगात 12 कोटी व्यक्ती त्याच्या युजर आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. अमेरिकेत त्यांची संख्या दीड कोटी आहे. Ask.fm एक सामान्य इलेक्ट्रॉनिक बुलेटिन बोर्ड आहे. त्यावर युजर प्रश्न विचारू शकतात. उत्तरे पोस्ट करू शकतात. शिवीगाळ व आपत्तीजनक पोस्टबाबत सूचना देण्याची व्यवस्थाही आहे. तरीही अनेक लोक यावर काहीही पोस्ट करतात.

संकेतस्थळाच्या दुनियेत नामानिराळे राहणे व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. सिक्रेट शेअरिंगचे प्रमुख संकेतस्थळ फॉर्मस्प्रिंग 2013 मध्ये बंद झाले. पण, सिक्रेट, व्हिस्पर व यिक याक सारखे संकेतस्थळ व अ‍ॅपने ही रिकामी जागा भरली आहे. स्मार्ट फोनने Ask.fm सारखे संकेतस्थळ व अ‍ॅपला लोकांचा दिवस-रात्रीचा साथीदार बनवले आहे. फोनची बेल वाजते व आपले मूल क्रूरता, असुरक्षेने भरलेल्या जगात पोहोचते.

न्यूरो सायन्सच्या नव्या शोधानुसार किशोरवयीनांचे विकसित होणारे व्यक्तिमत्त्व भावनात्मक प्रतिक्रियांना सहज स्वीकारू शकत नाही. वर्तमानपत्रानुसार 2012 मध्ये अमेरिका, युरोपमध्ये 16 किशोरवयीनांच्या मृत्यूचे कारण Ask.fm देखील आहे. मात्र, कोणताही सामान्य युवक एखाद्या संकेतस्थळामुळे स्वत:ला नुकसान पोहोचवू शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहे Ask.fm ?
- लाटवियात 35 वर्षीय इल्जा व 29 वर्षीय मार्क तेरेबिन या दोन भावांनी 2010 मध्ये या संकेतस्थळाची सुरुवात केली आहे.
- राजधानी रिगा येथे Ask.fm चे कार्यालय आहे. कंपनीत 58 कर्मचारी आहेत.
- संकेतस्थळाचे म्हणणे आहे की, आपत्तीजनक मजकूर असणार्‍या पोस्ट हटविल्या जातात. तसे युजर्सही प्रतिबंधित केले जातात.
- संकेतस्थळाकडून आपत्तीजनक भाषेतील पोस्ट स्कॅनिंगबाबत सॉफ्टवेअर वापरले जाते.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)