आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीनंतर जनसंपर्कात करिअर करू शकता; प्रसारमाध्यमांच्या विस्तारात पीआर व्यावसायिकांची महत्त्वाची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्पाेरेट क्षेत्रापासून सरकारी कार्यालयापर्यंत संपर्क यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असते. लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे आवश्यक असते. त्यामुळे कंपन्यांना अनेक महत्त्वाच्या जागी जनसंपर्क व्यावसायिकांची आवश्यकता भासते. एखादा इव्हेंट असो की पत्र परिषद, हे व्यावसायिक कंपन्या किंवा संस्थांसाठी चांगले संबंध निर्माण करण्याचे काम करतात. कॉर्पाेरेट क्षेत्राचा विस्तार व मीडियाच्या नव्या स्वरूपामुळे त्यांचे काम वाढले आहे. अशा स्थितीत तरुणांना करिअरसाठी चांगला पर्याय होऊ शकतो.   


जनसंपर्क म्हणजे काय   
एखादी कंपनी, व्यक्ती किंवा उत्पादनाची प्रतिमा वा महत्त्व लोकांमध्ये चांगले निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. हे एक प्रकारचे व्यवस्थापन आहे, ज्यात लोकांशी चांगले संबंध निर्माण केले जातात. कॉर्पाेरेट कम्युनिकेशनमध्ये याचे महत्त्व आहे. जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्यांना जनसंपर्क अधिकारी(पीआरओ) संबोधले जातात.   


प्रवेश कसा घेणार  
जनसंपर्क विषयात पदवी स्तरावर कोणताही कोर्स नाही. मात्र, मास कम्युनिकेशनच्या पदवी कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी यात करिअर करू होऊ शकते. कोणत्याही शाखेतील १२ वीनंतर विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो. चांगल्या करिअरसाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेच्या पदवीनंतर पब्लिक रिलेशनच्या पदव्युत्तर पदवी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो. देशात खासगी व सरकारी अशा अनेक संस्थांद्वारे हा कोर्स चालवला जातो. 

 
नोकरीच्या संधी कुठे  
जनसंपर्क अधिकाऱ्यास खासगी व सरकारी दोन्ही ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळते. हे व्यावसायिक कॉर्पाेरेट ऑफिस, सरकारी संस्था, हॉटेल, बँक, पर्यटन संस्था, खासगी कन्सल्टन्सी फर्म, पीआर फर्म व वित्तसंस्थांमध्ये काम करू शकतात. सध्या त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. राजकीय पक्ष व नेतेही पीआर टीम नेमत आहेत. त्यांच्या जनसंपर्क व्यवस्थापनाचे कामही पीआर व्यावसायिकांना करावे लागते.  


वेतन किती असेल  
सुरुवातीस चांगले पॅकेज मिळण्याची शक्यता कमी आहे. दोन - तीन वर्षांच्या अनुभवानंतर पॅकेज चांगले मिळते. यामध्ये नव्या उमेदवारांना दरमहा सरासरी १५ हजार रुपये असते. दोन-तीन वर्षांच्या अनुभवानंतर दरमहा ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

 

कोर्स कुठून करावा 
- आयआयएमसी, दिल्ली 
www.iimc.nic.in/
- एसआयएमसी, पुणे  
www.simc.edu
- मुंबई विद्यापीठ  
http://mu.ac.in/portal/
- एएमयू, दिल्ली  
www.amu.ac.in
 
नेतृत्वगुण कौशल्य 
- संवाद व लेखन कौशल्य  
- दबाव हाताळण्याची क्षमता  
- अॅनालिटिकल स्किल  
- संघटन कौशल्य 
बातम्या आणखी आहेत...