Home | Divya Marathi Special | p chidambaram campare s m krushna

चिदंबरम यांची तुलना कृष्णा यांच्याशी

agency | Update - Jun 06, 2011, 02:30 PM IST

पी. चिदंबरम यांनी मनमोहन सिंग यांचा पूर्णपणे विश्वास संपादन केला आहे.

  • p chidambaram campare s m krushna

    पी. चिदंबरम यांनी मनमोहन सिंग यांचा पूर्णपणे विश्वास संपादन केला आहे. मात्र, पाकिस्तानकडून मागवण्यात आलेल्या अपराध्यांच्या यादीत गोंधळ झाल्यानंतर भाजपकडून त्यांनाही निष्काळजी मंत्र्यांमध्ये गणले जात आहे.

    गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे प्रवक्ते निर्मला सीतारामन यांनी त्यांची तुलना एस. एम. कृष्णा यांच्याशी केली. या सरकारचे सर्व मंत्री बेजबाबदार असल्याचे सांगितले. पी. चिदंबरम यांनी एवढी मोठी चूक केली आहे तरी ती चूक कबूल करायला ते तयार नाहीत. म्हणजेच एस. एम. कृष्णा यांच्या वरचढ ते ठरले आहेत. चूक करूनही माफी मागायला ते तयार नाहीत. कृष्णा यांनी अनेक देशांच्या प्रतिनिधींसमोर दुसर्‍याच एका देशाच्या प्रतिनिधीचे भाषण वाचून दाखवले, तर चिदंबरम यांनी अशी यादी तयार करून पाकिस्तानकडे पाठवली की पाकिस्तानने ती लगेच परतही करून टाकली. या घटनेला अनेक दिवस उलटले असताना निर्मला मॅडमना या गोष्टींची आठवण का झाली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Trending