आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदनाशामक औषधांमुळे वेदना वाढण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या वेदनाशामक औषधाचा शोध नेहमी निराश करतो. विकोडीनसारख्या ओपिऑइड्सने आराम वाटतो, पण त्याची सवय लागते. अ‍ॅसिटामिनोफेन प्रभावी तर आहे, पण ते तुमचे यकृत निकामी करू शकते. हृदयासाठी लाभदायक असलेल्या अ‍ॅस्पिरीनमुळे अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. संधीवाताने त्रस्त असलेल्या लोकांसाठी वाईट बातमी आहे. दोन प्रसिद्ध नॉनस्टिरॉइडल अँटीइन्फ्लेमेटरी (एनएसएआयडीएस) औषधे घेणा-यांना हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.


ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे की, बंदी घातलेल्या वेदनाशामक औषधांसारखेच डायक्लोफिनॅक आणि आयबुप्रोफेनपासूनही हृदयाला धोका आहे. एक हजार रुग्णांमध्ये डायक्लोफिनॅक किंवा आयबुप्रोफेनच्या जादा डोसमुळे हृदयविकाराच्या झटक्याच्या 3, हृदय बंद पडण्याच्या 4, मृत्यूची 1 घटना घडल्याचे एका पाहणीतून समोर आले.


एनएसएआयडीएस जगभरात भरपूर प्रमाणात वापरले जाणारे परिमाणकारक औषध आहे. त्याचे पर्याय कमी होत चालले आहेत. कित्येक रुग्णांना फायदा होत असतानाही 2004 मध्ये मर्कने स्वत:हून व्हिऑक्स बाजारातून मागे घेतले. 2005 मध्ये अमेरिकेच्या अन्न औषध प्रशासनाने फायझरला बेक्स्ट्रा औषध मागे घ्यायला लावले. अरथ्रिटीस फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. जॉन हार्डिन म्हणतात की, त्यांचे संधिवाताचे रुग्ण व्हिऑक्सच्या उणिवेने आजही अस्वस्थ होतात.


हे आहेत धोके
सेलेकॉक्सिब - या औषधाच्या सेवनाने हृदयविकार आणि अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो, यासंबंधी इशारा द्यायला हवा.
डायक्लोफिनेक - अल्प काळासाठी हे दिले जाते. यापासून हृदयाला धोका.
आयबुप्रोफेन - दिवसभर 2400 मिलिग्रॅम पोटात गेल्यास हृदयासाठी धोकादायक.
नेप्रोक्सेन - शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्राव होण्याचा धोका असतो.
अ‍ॅस्पिरीन - संशोधनातून उघड झाले आहे की, अ‍ॅस्पिरीनमुळे रक्ताची गाठ होत नाही. वेदना कमी होतात. तरीही याच्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो.