आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशाचे खरे हीरो, पाकिस्‍तान विरुद्ध पाठवले होते पाहिले विमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देश स्वतंत्र झाल्यानंतर लाल किल्ल्यावर सकाळी हवाई दलाच्या विमानांनी स्वातंत्र्याचे पहिले उड्डाण केले होते. यामध्ये १२ विमाने होती. या टीमचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन अर्जन सिंह यांनी केले होते. देशात पाच स्टार असणारे तीनच लष्करी अधिकारी होऊन गेले. त्यात एक फील्ड मार्शल माणेकशॉ, दुसरे फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा आणि तिसरे मार्शल अर्जन सिंह. २००२ मध्ये हवाई दलाची मार्शल पदवी मिळवणारे ते एकमेव आहेत. १९६५ ची घटना आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हवाई दलास विचारले होते की, लष्कराकडे मदत मागितल्यास तुम्ही किती वेळात हवाई दलाची मदत देऊ शकाल? तत्कालीन एमआयएएफ अर्जन सिंह यांनी यासाठी केवळ एक तास वेळ पुरेसा असल्याचे सांगितले.
२६ मिनिटांत विमानाने केली होती उड्डाण
पठाणकोटहून हवाई दलाच्या विमानातून ४.३० वाजता तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे. एन. चौधरी परतले होते. पालम विमानतळावरून ते थेट एअर मार्शल अर्जन सिंह यांच्याकडे गेले. पाकिस्तानी लष्कराने चम्बा आणि अखनूर सेक्टरमध्ये वाईट स्थिती केल्याचे ते सांगत होते. दोघे संरक्षणमंत्र्यांच्या कक्षात आले. सायंकाळी ४.५० वाजता संरक्षणमंत्री चव्हाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि हवाई दलाच्या कारवाईस परवानगी दिली. यानंतर अर्जन सिंह यांनी त्वरित आदेश बजावले आणि २६ मिनिटांत हवाई दलाचे पहिले लढाऊ विमान पाकिस्तानी लष्कराविरुद्धच्या मोहिमेवर रवाना झाले. पावसाळा होता. अंधार पडायला दोन तास अवधी होता. मात्र, तेव्हा हवाई दलाच्या विमानांनी चम्बा आणि अखनूरमध्ये २६ उड्डाणे केली होती. एअर मार्शल अर्जन सिंह यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकले. पाकिस्तानने १ सप्टेंबर रोजी "ग्रँडस्लॅम' कोडअंतर्गत भारतावर हल्ला केला होता. भारतीय हवाई दल प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नव्हते. पाकिस्तानी लष्कराने भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता तेव्हा अर्जन सिंह यांना चव्हाण यांनी हल्ल्याची परवानगी दिली होती. २२ सप्टेंबर रोजी युद्धबंदी झाली त्या वेळी चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत लिहिले की, चौधरी आणि अर्जन सिंहांसाठी हा महान दिवस आहे. एअर मार्शल अर्जन सिंह देशाचे नायक आहेत. खूप सक्षम, दृढ आणि एक योग्य लीडर आहेत. मार्शल अर्जन सिंह यांचे पणजोबा लष्करात होते. गाइड्स केवेलरीमध्ये १८५४ पासून १८७९ पर्यंत ते कार्यरत होते. सेवाकाळातील एका युद्धात ते शहीद झाले. आजोबाही गाइड्स केवेलरीमध्ये १८८३ पासून १९१७ पर्यंत होते. विशेष म्हणजे वडीलही लष्करी सेवेत होते. पाकिस्तानच्या लायलपूर गावात अर्जन सिंह यांचा जन्म झाला. वयाच्या विसाव्या वर्षी ते रॉयल हवाई दलात वैमानिक झाले होते. ५० व्या वर्षी म्हणजे १९६९ मध्ये ते हवाई दलातून निवृत्त झाले आणि स्वित्झर्लंडचे राजदूत झाले. त्यांच्या अधिकार क्षेत्रात व्हॅटिकनही येत होते. त्या वेळी पोप जॉन पॉल सहावे यांच्यासोबत त्यांची अनेकदा चर्चा झाली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मार्शल अर्जन सिंह यांच्‍या संबंधित माहिती...