आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौसष्ट योगिनी मंदिरासारखेच आहे संसद भवनाचे काम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीतील संसद भवन ब्रिटिश वास्तुतज्ज्ञ सर एडविन लुटियन्स यांच्या संकल्पनेतून साकारल्याचे सांगण्यात येते. मात्र, याचा आराखडा मुरैना जिल्ह्यात मितावलीमध्ये असलेल्या चौसष्ट योगिनी शिवमंदिराशी मिळतेजुळते आहे. सध्याच्या संसदेची कोनशिला 12 फेब्रुवारी 1921 रोजी ठेवण्यात आली होती. सहा वर्षांच्या बांधकामानंतर तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इरविन यांनी 1921 मध्ये त्याचे उद्घाटन केले होते. बांधकामावर 83 लाख रुपये खर्च आला होता. जगातील कोणत्याही देशाच्या सध्याच्या संसदेमध्ये भारतीय संसद वास्तुकलेचा अप्रतिम नमुना मानली जाते. संसद भवनाच्या गोलाकार इमारतीचा व्यास 560 फूट आणि परीघ 533 मीटर आहे. सहा एकरांत विस्तारलेल्या इमारतीमध्ये 12 दरवाजे, हलक्या पिवळ्या रंगाचे 144 खांब ओळीने आहेत. प्रत्येकाची उंची 27 फूट आहे. संसद भवनासारखेच दिसणार्‍या गोलाकार मंदिरात 101 खोल्या ओळीत आहेत. जमिनीपासून 300 फूट उंचीवरील मंदिरात 64 खोल्या आहेत आणि प्रत्येकात एक शिवलिंग आहे.