आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिनेमागृहांची संख्या घटणे चिंताजनक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याने एका मुलाखतीत चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येत घट होत असल्याचे म्हटले होते. हे कटुसत्य चित्रपट उद्योगात वावरणाऱ्या सर्वांना माहिती आहे. परंतु जोहर यांनी पहिल्यांदा याचा जाहीर पुनरुच्चार केला. बॉलीवूड हा केवळ चित्रपट उद्योग नसून आम्हा भारतीयांची जीवनशैली बनला आहे. न जाणो आपणावर कधीपासूनच चित्रपट, कलावंत, संवाद, गीते-नृत्ये आणि वेशभूषेचा प्रभाव पडतो आहे.

मला वाटते, आता प्रेक्षक खूप जागरूक झाले आहेत. त्यांचा भर गुणवत्तापूर्ण मनोरंजनावर आहे. आता त्यांना पाचकळ विनोद आणि रडके चित्रपट आवडत नाहीत. त्यांना वेगळ्याच प्रकारची कथानके असलेले चित्रपट हवे आहेत. परंतु मुख्य प्रवाहात असलेल्या चित्रपटात नीरस आणि अजिबात धक्का न देणाऱ्या चित्रपटांची भरमार आहे. नव्या प्रकारच्या चित्रपटांचा शोध चालू असल्यामुळे रंगमंचाला चांगले दिवस येऊ लागले आहेत. भारतात एक लाख लोकांसाठी एक चित्रपटगृह अशी परिस्थिती आहे, तर अमेरिकेत एक लाख लोकसंख्येमागे १२ चित्रपटगृहे आहेत. चित्रपटगृह पाडून मॉल तयार करण्याचे प्रमाणही कमी हाेत चालले आहे. मल्टिप्लेक्समध्ये तिकिटे महाग असल्याने मध्यमवर्गीय परिवारास चित्रपटगृहात जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हा प्रकार म्हणजे लोकांचा मनोरंजनाचा अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे. अनेकदा आपण रस्त्यावर निघत असलेल्या मिरवणुका, गाण्याचे कर्कश आवाज यावरून चिडत असतो. मनात त्यांना शिव्याही घालत असतो. हे मनोरंजनाच्या अभावाचे कारण तर नाही ना? त्यात पायरेटेड चित्रपट घरात पाहिले जात आहेत. याचाही फटका बॉलीवूडला मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. विविध राज्यांतील सरकारांनी सिनेमागृहांची संख्या वाढवण्यासाठी एखादी योजना आणावी. भारतीय संस्कृती व हिंदी भाषेचे सर्वात मोठे दूत असलेल्या सिनेमांची भरभराट होणे आवश्यक आहे.

पार्थिवी जोशी,
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, गांधीनगर
बातम्या आणखी आहेत...