आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगिरी चांगली तर आयुष्यही सुंदर होईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यालयातील काम संपल्यानंतर सहका-यांशी वेळ घालवताना आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शिकायला मिळतात. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने पाच मॅनेजमेंट टिप्सच्या माध्यमातून आयुष्यातील यश समजावून सांगितले आहे.
जास्त परिणामकारकतेसाठी नियोजन हवेच
आपले नशीब चांगले असेल, तर तुमच्या आधी तुमची प्रतिष्ठा सर्वदूर पोहोचेल. कोणतीही नवी जबाबदारी घेण्याआधी आपली योग्यता, क्षमतेवर लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही काही सांगितल्यानंतर एखाद्याला ते समजले नाही हे तुमच्या लक्षात आल्यास, ते सांगण्याचा पुन्हा प्रयत्न करू नका. समजले नसेल तर ते स्वत:च्या पद्धतीने त्याचा अर्थ काढतील हा विश्वास बाळगा.
(स्रोत : डोंट देम अंडरइस्टिमेट यू, डॉरी क्लार्क)
जास्त शिकण्यासाठी लोकांशी जोडले जा
अनेक मॅनेजर्स आपल्या सध्याच्या जबाबदारीत संधी पाहू शकत नाहीत. तुम्ही महत्त्वाकांक्षी असाल, तर आपल्या मुख्य कामाच्या कक्षेबाहेर पाहण्यास सुरुवात करा. आपल्या संस्थेत नवा प्रोजेक्ट किंवा मोहिमेशी जोडले जा. अशा पद्धतीच्या प्रोजेक्टमध्ये मोठे उद्देश, नवे कौशल्य आणि नव्या संपर्कातून तुमचे महत्त्व वाढेल. अनुकूल प्रोजेक्ट उपलब्ध नसेल, तर संघटनेबाहेर पाहा. नवे कौशल्य आत्मसात करा आणि प्रोफाइल तयार करा. प्रौढांना शिकवू शकता. कोणत्याही परिषदेमध्ये जा, ब्लॉग लिहा किंवा अन्य कंपन्यांच्या लोकांना भेटण्यासाठी संमेलनात जा. यामुळे आपले कौशल्य आणि प्रतिष्ठा वाढेल. यामुळे तुम्हाला सध्याच्या संस्थेतही फायदा मिळू शकेल.
(स्रोत : ‘सिक्स वेज टू गो युवर जॉक’ : हर्मिनिया हबारा)
नेटवर्क बळकट करा, पुढे सरकत जा
व्यवसाय आणि पुरस्काराची माहिती देण्यासाठी लिंक्डइन हे सोशल नेटवर्क चांगले आहे. मात्र, त्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या आयुष्याची सर्व माहिती यात लिहा. ती माहिती आॅनलाइन करण्याआधी या गोष्टीवर जाणीवपूर्वक लक्ष द्या. उदाहरणार्थ, एक्स्पर्ट फाइल, नेम प्लेट साइट जसे - अबाउट मी. यात स्लाइड शेअरच्या माध्यमातून आपली प्रोफाइल तयार केली जावी.
* तुम्ही स्वतंत्र पद्धतीने काम करत असाल, तर आपल्या प्रोफाइलच्या माहितीची लिंकही देऊ शकता.
* पुस्तक, ब्लॉग लिहीत असाल, तर आपली योग्य दखल घेण्यासाठी अ‍ॅमेझॉन आदी साइट्सवर शेअर केल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल.
(स्रोत :‘डू यू नीड ए रिज्युम इन लिंक्डइन एस?’ अ‍ॅलेक्झांडर सॅम्युअल)
नवविचारांसाठी ठेवा खुला दृष्टिकोन
अनेक मोठ्या संघटनांमध्ये वरिष्ठ अधिकारी सहायक, स्टाफचे प्रमुख आणि सल्लागारांमध्ये असतात. अधिका-यांसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे त्यांना थोडीफार जास्त माहिती मिळू शकते. एखादी गुप्त माहिती पोहोचावी अशी या कर्मचा-यांची इच्छा असते. एक अधिकारी म्हणून ही प्रवृत्ती नष्ट करू शकत नाही. मात्र, खालील गोष्टींचा फायदा मिळू शकतो.
* सर्वांना एकत्र बोलता यावे असे ठिकाण तयार करा. नवा दृष्टिकोन समजण्यासाठी व्यवस्थापकांची बैठक घ्यावी. कर्मचा-यांचे म्हणणे कळण्यासाठी खुली बैठक घ्यावी.
* उदयोन्मुख नेतृत्वाला पुढे करता यावे, त्याच्या नेतृत्व गुणाला चालना मिळ यासाठी लीडरशिप डेव्हलपमेंट क्लास घेण्यात यावा.
(स्रोत : ‘द प्रॉब्लेम विथ एग्झिक्युटिव्ह आयसोलेशन,’ रॉन एश्केनास)
स्वत:मधील दोष ओळखत राहा
मॅनेजरकडून आपल्या कामाचा फीडबॅक घेते वेळी आपले कौशल्य समजून घ्या. तसेच त्यात सुधारणा करण्यासाठी ठरवून दिलेल्या गोष्टीवर लक्ष द्या. आढाव्याआधी स्वत: कौशल्याधारित शक्ती आणि दोष जाणून घ्या. सध्याचा बॉस फीडबॅक देण्यास सक्षम नसेल, तर तुम्हाला दुस-याचे मत विचारात घ्यावे लागेल.
(स्रोत : ‘व्हाट यू आर रिअली मीट टू डू’: रॉबर्ट स्टीव्हन केपलान)