आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्सन ऑफ द इयर 2016, डोनाल्ड ट्रम्प : आशा आणि संतापाचे प्रतीक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइम मासिकाने अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०१६ वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडले आहे. तथापि वाचकांची पसंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. मासिकाच्या संपादिका नेन्सी गिब्स लिहतात की, वर्षातील घटनांवर सर्वात चांगला आणि सर्वात वाईट परिणाम करणाऱ्या व्यक्तीची निवड करण्याची ही आमची ९० वी वेळ आहे. म्हणून हे वर्ष कसे आहे? चांगले की वाईट ? डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आव्हान आहे की अमेरिकेसाठी. या प्रश्नाच्या उत्तरांशी अमेरिका कितपत असहमत आहे. आणि वाचकांची पसंती नरेंद्र मोदी : टाइमच्या ऑनलाइन मतदानात नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक म्हणजे १९ टक्के मते मिळाली. वाचकांना विचारण्यात आले की, पर्सन ऑफ द इयर कोण आहे. मोदी यांनी वाचकांच्या पसंतीनुसार अनेक बाबतीत जागतिक नेत्यांना मागे टाकले. बराक ओबामा व विकिलीक्सचे ज्युलियन असांज ७ टक्के, अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना ४ टक्के, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांना २ टक्के मते मिळाली. आता आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह टाइमने निवडलेली काही चर्चित व्यक्तिमत्त्वे जाणून घेणार आहोत.

टाइमने मुखपृष्ठावर लिहिले : प्रेसिडेंट ऑफ द डिव्हायडेड स्टेट्स ऑफ अमेरिका

मायकेल स्केरर
न्यूयॉर्कच्या ट्रम्प टॉवरच्या सर्वात उंच तीन मजली ६६ ते ६८ अशा तीन मजल्यांवर अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान आहे. या मजल्यांवर त्यांचे कर्मचारी आपल्या चपलांवर कपड्यांचे कव्हर घालतात. कारण तेथील संगमरवरी फरशांवर आेरखडे पडू नयेत. तसेच क्रिम रंगाचे महागडे कार्पेट खराब होऊ नये म्हणून. ही जागा अतिशय भव्य आणि भडक आहे. भिंतींवर अंधूक टेपेस्ट्री, दुर्मिळ प्राचीन घड्याळे आणि ग्रीक देवतांच्या फ्रेस्को स्टाइलमधील चितारलेले छत. ट्रम्प यांचे नाव उशांवर आणि पेपर नॅपकिनवर त्यांच्या कुटुंबाचे नाव आहे. मिडटाऊन मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचे अनेक शेजारी अब्जाधीश आहेत. ट्रम्प टॉवरमध्ये इकडे तिकडे फिरत असताना तेथील गुप्तचर जणू सांगत असतात की, ट्रम्प हे आता अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांची पत्नी मेलानिया यांच्या डेस्कवर गियानी वर्सेक यांची फॅशन, दागिण्यांवर एलिझाबेथ टेलर यांच्या पुस्तकांसमवतेत द व्हाइट हाऊस : इट्स हिस्टोरिक फर्निशिंग्ज अँड फस्ट फॅमिलीज या पुस्तकाची नवी प्रत ठेवण्यात आली आहे.

ट्रम्प यांना सार्वजनिक जीवनात त्यांचे विरोधक अश्लिल, गेंड्याच्या कातडीचा आणि भक्कम बांध्याचा शोमन म्हणून टीका करतात. पण या टीकाकारांना हे समजत नाही की, यामुळेच ट्रम्प यांना ताकद मिळते. अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या वादग्रस्त बोलण्यातून टॅब्लाइड वृत्तपत्रांना हेडलाइन मिळवून दिल्या आणि सामान्य लोकांशी स्वत:ला जोडले. आता त्यांनी अमेरिकेेच्या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतृत्वांना मागे टाकून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या राजकीय दिशा बदलून टाकल्या आहेत. आपल्या डायनिंग रुममध्ये एका घोड्याच्या नालेच्या आकारातील संगमरवरी टेबलासमोर बसलेले ट्रम्प सांगतात की, मी राहतोय ती इमारत अनेक लोकांनी कधी पाहिलेही नसेल. हीच गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करून जाते. तरीही मी जगातील कामगारांचे प्रतिनिधीत्व करतो. टम्प यांनी मतदारांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवण्याऐवजी वर्तमान समस्यांना रंगवून सांगण्यात यश मिळवले. लोकांमध्ये संताप आणि भिती निर्माण केली. त्यांनी अमेरिकी मतदारांना प्रेरित करणाऱ्या मुख्य मुद्यांना ओळखले आणि यात परिवर्तन करण्यासाठी मीच योग्य उमेदवार असल्याने पटवून देण्यात यश मिळवले. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनविण्याचा नारा दिला. ते सांगत राहिले की, जगाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक नोकऱ्यांची चोरी होत आहे.

ट्रम्प यांच्या विजयासोबत अमेरिकेच्या अर्थिक स्थितीमध्ये आलेल्या परिर्वतनाला जोडता येऊ शकते. २००१ ते २०१२ च्या दरम्यान पदवी संपादन केलेल्या घरप्रमुखाच्या कुटुंबांचे उत्पन्न घटत गेले. अमेरिकेत १९८० ते २०१३ या काळात मध्यमवर्गाची स्थिती खालावत गेली. स्पेन, जर्मनी, नेदरलँड आणि ब्रिटेनमध्येही अशीच परिस्थिती आहे. हे सर्व देश राजकीय उलथापालथीचा सामना करीत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर अर्थतज्ञ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मतदारांच्या संताप यांचा संबंध असल्याचे सांगत आहेत. २००२ ते २०१४ या काळात ज्या राज्यामध्ये चीनमधून आयात वाढली त्या राज्यात ट्रम्प यांना सर्वाधिक मतदान झाले आहे.

ट्रम्प यांंनी महिला, मुस्लिम अाणि शरणार्थीसंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. डेमोक्रेटिकच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांचे म्हणणे होते की, आपला देश ज्या तत्त्वांमुळे महान आहे त्या तत्त्वांबद्दलची ट्रम्प यांची अपमानस्पद भाषा धोकादायक आहे. मतदानाच्या एक दिवस आधी हिलेरी यांनी फिलाडेल्फियातील एका रॅलीत सांगितले की, या निवडणुकीत आपल्या मूळ तत्त्वांची परीक्षा आहे. ही रणनिती यशस्वी राहिली पण हिलेरी घटत्या अमेरिकी जीवनस्तराच्या मुद्यापासून दूर जात राहिल्या. १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांचे गुरु व सल्लागार राहिलेेले स्टेनले ग्रीनबर्ग यांनी मतदानापूर्वी एक सर्वेक्षण केले. त्यात असे निरीक्षणास आले की, ज्या राज्याची अर्थिक स्थिती खराब आणि बेरोजगारी जास्त आहे तिथे अंतिम आठवड्यातील प्रचारात अर्थिक मुद्यांऐवजी इतर मुद्यांवर जोर देण्यात अाला. त्यामुळे या भागात जोरदार फटका बसला.

डायनिंग रूममध्ये टाइमच्या प्रतिनिधीने ट्रम्प यांना ओबामा यांचे हिंसा आणि आदिम भावनांना काबूत ठेवण्याचे आव्हान करणारे एक वाक्य ऐकवले. त्यावर ट्रम्प म्हणाले, मी तुम्हाला वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एक बातमी दाखवतो. ते तत्काळ पायऱ्या चढून वर जातात आणि त्या दिवशी प्रकाशित झालेल्या एक टॅबलाइट वृत्तपत्राची प्रत घेऊन येतात. त्याच्या पहिल्या पानावर प्रसिध्द झालेल्या बातमीमध्ये परकीय व्यक्तींकडून झालेल्या हिंसेचा वृत्तांत आहे. ट्रम्प म्हणतात की, हे लोक मध्य अमेरिकेतून येतात. लोकांचे खून करतात. बलात्कार करतात. ते अनधिकृतपणे राहतात. तरुणींच्या कपाळावर आपले नाव लिहितात. या लोकांना आम्ही चांगली वागणूक द्यावी?

फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियममध्ये मुस्लिम निर्वासितांविरोधात सुरू असलेल्या आक्रोशाचा उल्लेख करून ट्रम्प सांगतात की, लोकांना आपल्या देेशाचा अभिमान आहे. तुम्हाला राष्ट्रवाद वरचढ दिसेल. अनेक लोक थोपण्यात आलेल्या संकल्पना फेकून देतात. ब्रिटेनमध्ये युरोपियन युनियनच्या विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये हे एक कारण आहे. निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक गोष्टींवर आपले मत बदलले आहे. ते सर्व निर्वासितांना देशाबाहेर काढण्याच्या आणि मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास मनाई करण्याच्या घोषणेवरून माघार घेतली आहे. निवडणुकीवेळी मी अनेक चुकीच्या गोष्टी बोललो होतो, असे ते सांगतात. ट्रम्प यांनी अाश्वासन दिले होते की, बेकायदेशीरित्या आलेल्या लोकांना काम करण्याचा व्हिसा देण्याच्या ओबामा यांच्या निर्णयाची चौकशी होईल. सद्यस्थितीत ट्रम्प यांची अमेरिकाचा चांगला की वाईट हे कुणीही सांगू शकत नाही. ट्रम्प टॉवरच्या मालकांना हे माहित नाही. ट्रम्प म्हणतात की, हा खूप रोमांचक काळ आहे. वास्तवात आश्चर्यजनक आहे.
बातम्या आणखी आहेत...