आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केटी लारकिनने पहिल्यांदा 1980 मध्ये पिट बुल कुत्रा त्यावेळी पाहिला, जेव्हा तिचा मित्र एक मोठ्या आणि रुंद तोंडाचा लहान मात्र तगडा कुत्रा तिच्या घरी घेऊन आला होता. लारकिन सांगते, ती जेव्हा पिट बुलला घेऊन बाहेर जायची तेव्हा लोक रस्त्याच्या दुस-या बाजूला निघून जात असत. पिट बुलच्या कित्येक मालकांना या स्थितीला तोंड द्यावे लागते. पिट बुल (टॅरियर) जातीच्या कुत्र्यांना आक्रमक स्वभावामुळे आणि इतर कुत्र्यांशी लढणारा म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ते अमेरिकेत सगळ्यात कमी पाळले जाणारे कुत्रे आहेत. मियामीच्या डेनव्हरमध्ये पिट पाळणे, जोपर्यंत ते गाइडच्या श्रेणीत नाही, बेकायदा आहे. अमेरिकेतील 300 नगरपालिका क्षेत्रांत कुत्रे पाळण्यावर बंदी आहे. पिट बुलचा लोक इतका तिटकारा करतात की, मोकाट कुत्रे ठेवले जाणा-या शेल्टर्समध्ये सर्वाधिक संख्या त्यांचीच आहे.
आता अमेरिकेत कुत्रे पाळणा-यांची संख्या वाढत आहे. लॉस एंजेलिस शहरात एंजेल सिटी पिट बुल नावाची एक संघटना लोकांना पिट बुल पाळण्यासाठी प्रोत्साहन देते. अभिनेत्री जेसिका बिएल आपल्या पाळीव पिटचे छायाचित्र ट्विट करते. दुसरीकडे, चवताळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या लोकांच्या संघटनेने dogsbite.orgसांगितले की, अमेरिकेत 2006 ते 2008 दरम्यान कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या 88 पैकी 52 जण पिटमुळे मृत्युमुखी पडले.
पिटचा इतिहास लिहिणारे ब्रोनवेन डिकी सांगतात, 200 वर्षांपूर्वीपर्यंत टॅरियर त्या कुत्र्याला म्हटले जात असे जे धान्य खाणा-या छोट्या प्राण्यांची शिकार करायचे. बुलडॉग शेतांमध्ये येणारी जनावरे हाकलून लावायचा. 1790च्या आसपास टॅरियर, बुलडॉगच्या क्रॉसब्रिडिंगमधून बुल टॅरियरचा जन्म झाला. पिट बुल त्याचा वंशज आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.