आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदी राहण्याचे प्लॅनिंग आजपासूनच करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदी राहण्यासाठी दररोज प्रयत्न करावे लागतात. मी रोज सकाळी आनंदी राहण्याची योजना आखतो आणि दिवसभर आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. रात्री झोपताना दिवसभर मी आनंदी राहण्यात यशस्वी झालो की नाही ते पडताळून पाहतो. जास्तीत जास्त लोकांना वाटते की, सुख योगायोगाने मिळत असते, पण असे नाही. आनंदी राहण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. अनेकजण आनंदी राहण्यासाठी सकाळी प्लॅन करायला विसरतात. योजना आखली नसेल तर आनंदी राहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परिणामी आपण योजनाही आखत नाहीत आणि आनंदीही राहत नाहीत. म्हणून आपण आयुष्याचा आनंद घेत जगण्याऐवजी फक्त दिवस काढत असतो. गेल्या आठवड्यातच माझ्या पत्नीचे एक नातलग 35 वर्षांनंतर अमेरिकेतून परतले. आम्ही त्यांना जेवणासाठी बोलावले. त्या दिवशी मी सकाली प्लॅन केला की, आपण त्यांना भारतीय हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जाऊ. सर्वांसाठीच हा चांगला अनुभव असेल.


रेस्टॉरंट मॅनेजरला सांगितले की, आम्हाला एखादी अशी शांत जागा दे, जिथे आम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येईल. जेवणाची ऑर्डर देण्यापूर्वी मेन्यूकार्डमधील सर्वांची आवड-निवड पाहून ‘सरसों का साग आणि मक्के की रोटी’ ऑर्डर केली. मी वेटरला गूळ आणि दही आणायलाही सांगितले. अमेरिकन नातेवाइकांनीही गुळाच्या संगतीने जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला. ते म्हणाले की, अमेरिकेत गूळ मिळतो, पण इथल्या गुळाची चवच निराळी आहे. ते ऐकून मी त्यांना भेट म्हणून गूळच द्यायचे ठरवले. मी मॅनेजरला एक किलो गूळ पॅक करायला सांगितले. मॅनेजरला म्हटलो की, हे लोक अमेरिकेतून आले आहेत. त्यांना रेस्टॉरंटमधील जेवण, गूळ आणि तुमची सर्व्हिस खूप आवडली. मॅनेजर हसला आणि म्हणाला की, हॉटेलमध्ये वापरलेला गूळ हरियाणातून येतो. आम्हाला गूळ देताना आनंद होत आहे. ते ऐकून आमच्या नातेवाइकांनी मॅनेजरला आलिंगन देऊन प्रेम व्यक्त केले. अमेरिकेला परतल्यानंतर त्या नातेवाइकांनी पत्नीला फोन करून भारत दौºयाचा प्रत्येक दिवस संस्मरणीय ठरल्याचे सांगितले, पण त्यात गुळासोबतचे जेवण खूपच आवडल्याचे सांगितले. ते लोक दररोज नाश्ता करताना गूळ खातात आणि रेस्टॉरंटच्या आठवणी जागवतात. त्यामुळे खाण्यातील लज्जतही वाढते. लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतात. मी हॉटेलच्या मॅनेजरला फक्त विनंती केली होती आणि त्याने सगळे काम खूप चांगल्या प्रकारे करून दाखवले होते. त्यामुळे मला, माझ्या नातेवाइकांना आणि मॅनेजरलाही चांगले वाटले.