आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Narendra Modi Visit To Bhutan, Nepal, Japan, America News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ANALYSIS: भारतीय वाघाच्या डरकाळीने ड्रॅगनला धडकी, वाचा मोदींची चाणक्यनिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी ते भूतान आणि नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. शपथविधी समारंभाला सार्क देशाच्या नेत्यांना बोलवून त्यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच परराष्ट्र कुटनितीचा परिचय करुन दिला होता. प्रथम भूतान, त्यानंतर नेपाळ आता जपान आणि याच महिन्यात अमेरिका दौरा. मोदींच्या या चतूर पावलांची चाहूल चीनला लागल्याने या देशाने जाहीर नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
मोदींनी तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय दबावाने चीनच्या उरात धडकी भरली आहे. मोदींच्या प्रत्येक हालचालींवर चीन बारिक लक्ष देऊन आहे. जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर मोदी पहिलेच पंतप्रधान असावेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय पटलावर सक्षम भारताची प्रतिमा उमटवली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी भाजपच्या पाया मजबूत केला. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेस गुजरातमध्ये सत्तेत येऊ शकली नाही. भाजपकडून त्यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काहींनी ही या पक्षाची घोडचुक असल्याचे ठासून सांगितले. पण मोदींनी स्वतःला सिद्ध करुन दाखवले. कॉंग्रेससह काही राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षांचा सुपडा साफ केला. एकहाती सत्ता आणून दाखवली. यावेळी भारतात केवळ मोदी, मोदी आणि मोदीच होते.
पण या टप्प्यावर आल्यावर थांबतील ते मोदी कसले. त्यांनी सार्क देशाच्या पंतप्रधानांना शपथविधीला बोलवून आणि त्यांची उपस्थिती अनिवार्य करुन आपल्यातील नेतृत्वगुण पुन्हा सिद्ध केला. भारत आणि शेजारी राष्ट्रांमध्ये पंतप्रधानपदाची प्रतिमा मजबूत केली. पण आता मोदींनी अगदी जागतिक नेतृत्वाच्या दिशेने गरुड झेप घेतली आहे. चीनला कोंडीत पकडून भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, मोदींच्या कुटनितीने का घाबरलाय चीन... भारताशी मैत्रिपूर्ण संबंध राहावेत असा चीन प्रयत्न का करतोय...
(फोटो सौजन्य- गुगल)