आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी ग्रेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवी ग्रेस हरपला
स्पंदांच्या तुटल्या तारा
आर्त आळवित सूर
आभाळ पेटवी वारा
पोरके जाहले दु:ख
अन् वेदना निराधार
गहिवरल्या शब्दांचा
मी कसा आवरु भार
उरातल्या जखमांची
तुटून पडली नाळ
दारात उभी साजणी
व्याकूळली संध्याकाळ
क्रूर निघाली नियती
म्हणून नाही रुसला
घाव जिव्हारी पेलून
पुन्हा पुन्हा तो हसला
बांधून शेवटी गेला
घाट नव्या कवितांचा
अजरामर तो एक
किमयागार शब्दांचा...
- कु. पार्वती घाडगे
सोलापूर