आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंची हिमालयाची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होती तुझ्यात बाबा उंची हिमालयाची
अन् काळजात होती खोली जलाशयाची
होते मुके तयांना वाचा अशी दिली की
ते बोलतात आता बोली नव्या युगाची
या दर्शनास त्यांच्या जयभीम करा त्यांना
हे संविधान आहे, आजन्म स्मरा त्यांना
ताऱ्यात कधी दिसती, वाऱ्यात कधी हसती
मातीत असे रुजले नच मृत्यु जरा त्यांना
आभार सदा माना आधारवडाचे ह्या
हा कल्पवृक्ष आहे, हृदयात धरा त्यांना
देशास दिली दृष्टी या विश्वमानवाने
माने महान द्रष्टा हा देश पुरा त्यांना
त्यांनीच व्यक्त केले अव्यक्त माणसांना
म्हणती तृषार्त सारे आनंदझरा त्यांना
माणूस असा मोठा होतो युगायुगांनी
लादू नये कुणीही देवत्व नुरा त्यांना
काळोख भेदणारा हा ज्ञानसूर्य होता
शोभून दिसे बाबा हा शब्द खरा त्यांना