आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Leaders Take Advantages Of Babasaheb Purandare Issue

ANALYSIS: जाणून घ्या, पुरंदरे प्रकरणाचा कुणाला किती राजकीय लाभ झाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणे हा राजकीय पक्षांचा कधी काळी अजेंडा होता. पण सध्याचे राजकीय पक्ष केवळ आणि केवळ राजकारण करतात. त्यात भावनेच्या राजकारणाने गेल्या काही दिवसांमध्ये उचल खाल्ली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरुन झालेला गदारोळ याचेच एक उत्तम उदाहरण आहे. पण यात जनतेच्या भावना गुंतलेल्या होत्या. बऱ्याच वादग्रस्त विषयांना या निमित्ताने फोडणी मिळाली. पण राजकीय पक्षांना याच्याशी काही देणे घेणे नव्हते. तुम्ही जगा किंवा मरा आम्हाला त्याच्याशी काही सोयर सुतक नाही. आम्ही केवळ राजकारण करणार. आमची व्होटबॅंक पक्की करणार हेच या निमित्ताने दिसून आले.
पुरंदरे प्रकरण जरा बारकाईने बघितले तर बरेच क्लिष्ट आहे. हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी निश्चितच सर्वसामान्य नागरिकाला काही महिने अभ्यास करावा लागेल. त्यानंतर त्यावर मत व्यक्त करण्याची क्षमता आपल्या अंगी येईल. पण काल ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रतिक्रियांचा अगदी पाऊस कोसळत होता. कुणाला काही विचारले नाही, तरी त्याच्या तोंडून कुणाला तरी अनुसरुन किंवा कुणाच्या तरी विरोधात भूमिका समोर येत होत्या.
पण एक मात्र नक्की या प्रकरणात सर्वांनी आपली राजकीय हात धुवून घेतले. होईल तेवढा फायदा करुन घेतला. आपली व्होटबॅंक पक्की केली. त्याचा वारंवार प्रत्यय येत होता.
पण नंतर प्रश्न येतो तो सध्या व्होट बॅंक पॉलिटिक्सची गरज तरी काय... भाजप-शिवसेना युती किमान पाच वर्षे सत्तेत राहिल एवढे बहुमत आहे... त्यावर उत्तर असे, की शिवसेना सध्या सत्तेत असली तरी अगदी पहिल्या दिवसापासून समाधानी नाही. शिवसेनाला ब्लॅकमेल करुन भाजपने सत्तेत ठेवले आहे. भाजपविरोधी वातावरण तयार झाले, की एखादी संधी शोधून भाजपला घटस्फोट देण्याचा शिवसेनेचा मानस आहे. शरद पवारांनी ही हवा वेळीच ओळखली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी पवार म्हणाले होते, की युतीचे सरकार काहीच दिवसांचे आहे. महाराष्ट्राच्या मुरब्बी राजकारण्याने केलेले हे सुचक विधान होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्याचा कुणाला किती फायदा झाला....राज ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांनी कसे राजकारण केले... भाजप आणि फडणवीस यांनी कसे नुकसान करुन घेतले...