आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Parties Quarreling Eachother In Election Agenda

राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातूनही झाडल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फौरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. जाहीरनाम्यांतून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातूनही झाडल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये रविवारी निवडणूक प्रचार थांबला. मंगळवारी दुसर्‍या व अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. आता दोन्ही पक्षांकडे सोशल मीडियाचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आपले म्हणणे मांडण्यासाठी या माध्यमाचा भरपूर वापर होत आहे. मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या पेजवर आतापर्यंत एक-दोन पोस्ट दिसत होते. मात्र, गेल्या 24 तासांत 13 पोस्ट आल्या. गुरू पर्वाच्या शुभेच्छा वगळता, ‘डॉ. रमण और कमल फिर से’ हे पोस्ट करण्यात आले आहे. त्यांनी आपला एक व्हिडिओ टाकला आहे. यामध्ये त्यांनी राज्यातील विकास कामाचे र्शेय घेतले आहे.
राजस्थान
राजस्थानमध्ये कॉँग्रेसने रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानिमित्ताने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रकारांशी बोलतानाचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे. यावर अध्रे फॉलोअर्स जुनी भरतीप्रक्रिया पूर्ण न होण्यास गहलोत जबाबदार असल्याचा आरोप करत आहेत. दुसरीकडे गहलोत सर्मथक वसुंधरा सरकारमध्ये भ्रष्टाचाराची गणती करत उत्तर देत आहेत. वसुंधरा यांच्या पेजवर रविवारी आलेल्या तीन पोस्टपैकी दोनमध्ये कॉँग्रेसवर निशाणा साधण्यात आला होता. निवाई विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान आपल्या फोटोसोबत लिहिले की, कॉँग्रेस केवळ पैसा वाटते. अन्य एका पोस्टमध्ये गहलोत सरकारमधील व्यक्ती, महिलांशी गैरवर्तन करणारे असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी रविवारी फेसबुकवर स्पष्टीकरण दिले. आपल्या अखत्यारित काम करणार्‍या दिल्ली पाणी मंडळाच्या चार प्रकल्पांतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करत असल्याचे ते फालोअर्सना सांगत आहेत. सीबीआयच्या प्रश्नावर मंडळाच्या अधिकार्‍यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी या घोटाळ्याशी संबंधित आरोप म्हणजे विरोधकांचा अपप्रचार असल्याचे सांगितले. आप पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना निवडणूक लढवण्यासाठी लोकांनी 20 कोटी रुपये निधी दिला. त्याबद्दल त्यांनी फेसबुकवर लोकांचे आभार मानले. याव्यतिरिक्त त्यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याचा व्हिडिओही जारी केला आहे.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये भाजपने शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने भाजपला चोरांचा पक्ष ठरवले. रविवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटर आणि फेसबुकवर त्याचे उत्तर दिले. त्यात लिहिले की, होय, आमच्या सर्मपण भावनेमुळे लाखो लोकांचे हृदय चोरले आहे. आम्ही राज्याच्या गरिबांना केंद्राच्या निधीच्या भरवाशावर सोडणार नाहीत. दुसरीकडे, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या फेसबुक पेजवर भाजपसाठी कठोर पोस्ट आला- ‘मध्य प्रदेशातील आतापर्यंतच्या सर्वात भ्रष्ट सरकारचा खोटेपणा, दांभिकपणावर एकमेव उत्तर - कहो दिल से काँग्रेस दिल से।’