आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pope Francis And Queen Elizabeth Meet In Rome News In Divya Marathi

पोप यांना अंडी आणि स्कॉच व्हिस्कीची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथने पोप फ्रान्सिस यांना आपल्या फार्महाऊसमध्ये उगवलेल्या निवडक वस्तू भेट दिल्या आहेत. अलीकडेच आपल्या व्हॅटिकन भेटीदरम्यान त्यांनी पोपना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये अंडी आणि स्कॉच व्हिस्कीचा समावेश होता. नामवंत प्रतिष्ठितांनाही विशेष उपहार भेट दिले जात आहेत. अशा काही भेटवस्तू..

कुत्रा - बल्गेरियाचे पंतप्रधान बॉयको बोरिसोव्ह यांनी रशियाचे तत्कालीन पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांना 2010 मध्ये एक कुत्रा भेट दिला होता. त्या वेळी दोन्ही देशांत गॅस पाइपलाइनचा करार झाला होता.

वाइन कूलर - 1972 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष जॉर्ज पांपिडू यांनी ब्रिटनच्या महाराणीला टोळ या प्राण्याच्या आकाराचे एक विशाल वाइन-कूलर भेट दिले होते.

विमा पॉलिसी - ऑस्ट्रेलियाच्या उत्तर क्षेत्राच्या प्रमुखांनी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांना 2012 मध्ये मगरीच्या विम्याची 51 हजार डॉलरची पॉलिसी भेट दिली.

खेळणी - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी 2011 मध्ये ओबामा यांना हाडाचे खेळणे त्यांच्या बो नावाच्या कुत्र्यासाठी दिले होते. त्यावर ब्रिटनचा झेंडा कोरलेला होता.

उंट - मालीने गेल्या वर्षी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांना उंटाचे पिलू भेट म्हणून दिले होते. इस्लामी बंडखोरांशी दोन हात करण्यासाठी फ्रान्सने केलेल्या मदतीबद्दल अशा पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती.