आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ टप्प्यावर स्वत:ला सावरा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेनोपॉजचा काळ प्रत्येक महिलेसाठी त्रासदायक असतो. या काळात शारीरिक व मानसिक स्तरांवर मोठे बदल होतात. अनेकदा अति गरमी किंवा बऱ्याचदा थंडी वाजल्यासारखेही होते. त्यामुळे झोपमोड होते. चिडचिड व तणावामुळे रडू येणे तर नेहमीचेच होऊन जाते. या काळात शरीरात हार्मोनल बदल होतात. ते फक्त तिलाच जाणवतात. वय वाढल्याची जाणीव आणि दैनंदिन जबाबदाऱ्या यात तिचे मन आक्रसून जाते. जीवनाच्या या टप्प्यावर ऑफिस, जोडीदार, मुलं, वृद्ध माता-पिता सगळेच तिच्यावर निर्भर असतात. यादरम्यान अनेक मानसिक समस्या उद्भवतात. भविष्याविषयी विचार करून अकारण दबाव येतो. या टप्प्यावर स्वत:ला कसे सावरावे जाणून घ्या...

डॉक्टरांची मदत घ्या
तुमच्या नेहमीच्या स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या. निःसंकोचपणे समस्या सांगा. आहार व जीवनशैलीत बदल करतानाच हॉट फ्लशेससाठी ध्यानधारणा करा. सकारात्मक ऊर्जा केवळ क्रोध व दु:खाशी लढत नाही, तर तुमच्यात एक सर्जनशीलता निर्माण करते. बिकट परिस्थितीत धैर्य टिकवून ठेवा.

गरजांवर लक्ष केंद्रित करा
चांगले ब्लॉग, पुस्तके, चित्रपट, पॉडकास्ट आणि संगीत तुम्हाला सकारात्मक प्रेरणा देतील. नवी कामे हाती घेताना भीती वा माघार घेण्याची गरज नाही.

स्वत:चे नेटवर्क तयार करा
वयाच्या या टप्प्यावर जास्तीत जास्त वेळ मित्रपरिवारासोबत व्यतीत करा. सोशल सपोर्ट सिस्टिम तयार करा, तीच भविष्यासाठी मोठी साथ देते.

मोकळेपणाने बोला
तुमचे विचार व्यक्त केल्यास मोकळे वाटते. आपल्या गरजा व इच्छा जवळच्या व्यक्तीकडे मोकळेपणाने मांडा. तुम्हाला आपल्या माणसांची गरज असते.

भविष्याचा विचार करा
बदलांना स्वीकारण्याची मानसिकता ठेवा. सर्वात मोठी तयारी असते मानसिक स्तरावरची. अमुक एक गोष्ट मी करू शकते, मला कशात आनंद मिळतो? याविषयी एक यादी तयार करा. तणाव येत असेल तर ते सर्व करा ज्यातून आनंद मिळतो.

(मानसशास्त्र प्रोफेसर, एमआयएमएचएएनएस, बंगळुरू)
बातम्या आणखी आहेत...